ETV Bharat / state

बीडकरांनो लॉकडाऊन नको असेल तर नियम पाळा; दिवसाला आढळतात 40 ते 50 पॉझिटिव्ह रुग्ण - बीड कोरोना न्यूज

एकूण लोकसंख्येच्या तुलनेत बीड जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती जिल्हा प्रशासनाच्या आवाक्यात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, असे असले तरी नागरिकांनी नियम पाळले नाही तर पुन्हा बीड जिल्ह्यात लॉकडाऊन लावावे लागेल.

beed corona
बीड कोरोना
author img

By

Published : Feb 24, 2021, 6:21 PM IST

Updated : Feb 24, 2021, 6:57 PM IST

बीड - राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये कोरोना पुन्हा एकदा अधिक गतीने पसरत आहे. बीड जिल्ह्यात मात्र अद्यापही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची परिस्थिती आवाक्यात आहे. पुन्हा लॉकडाऊन नको असेल तर नियम पाळा, अशा सूचना जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासनाने बीडकरांना दिलेल्या आहेत. या शिवाय धार्मिक स्थळांना नियम पाळण्याबाबत सांगण्यात आले असून, जिल्ह्यात 11 तालुक्यामध्ये दिवसाला 40 ते 50 एवढेच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. आज घडीला बीड जिल्ह्यात 311 रुग्ण सक्रिय आहेत.

प्रतिनिधी व्यंकटेश वैष्णव यांनी घेतलेला आढावा

हेही वाचा - भुसावळात नगरपालिका निवडणुकीपूर्वीच राजकीय भूकंप घडवण्यात राष्ट्रवादीला यश!

महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांप्रमाणे बीड जिल्ह्यात संचारबंदी लागणार का? अशी भीती हातावर पोट असलेल्या गोरगरीब नागरिकांच्या मनामध्ये आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी नियम पाळावेत असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यातील धार्मिक स्थळांना कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेले नियम काटेकोरपणे पाळण्याबाबत सांगण्यात आले आहे. बीड शहरातील कन्कलेश्वर मंदिर येथे सर्व नियमांचं पालन करत भाविक महादेवाचे दर्शन घेतात, असे येथील पुजारी संजय महाराज गुरव यांनी सांगितले.

भाविकांना प्रसाद दिला जात नाही-

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मंदिर संस्थांकडून दर्शनासाठी आलेल्या भाविकांना प्रसाद दिला जात नाही. याशिवाय दोन भाविकांमध्ये पाच फुटाचे अंतर ठेवण्यासंदर्भात सूचना केल्या जातात. तसेच मूर्तीला हात लावू दिला जात नाही, अशी माहिती कंकालेश्वर मंदिर संस्थानचे पुजारी संजय गुरव यांनी दिली आहे.

हेही वाचा - संजय राठोड हाच पूजा चव्हाण हिचा मारेकरी आहे - चित्रा वाघ

याशिवाय बीड जिल्ह्यातील परळी शहरात प्रभू वैद्यनाथाचे मंदिर आहे. याठिकाणी राज्यभरातून भाविक वैद्यनाथाच्या दर्शनासाठी येतात. याठिकाणी आलेल्या भाविकांनी सोशल डिस्टन्सचा नियम पाळावा यासाठी ठिकठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले असल्याचे प्रभव वैद्यनाथ देवल कमिटीच्या सदस्यांनी सांगितले.

अशी आहे बीड जिल्ह्यातील सध्या स्थिती-

मागील 9 महिन्याच्या काळात बीड जिल्ह्यात एकूण 18 हजार 559 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण झाले. यापैकी 17 हजार 674 एवढे रुग्ण बरे झालेले आहेत. आतापर्यंत 574 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. आजघडीला बीड जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये 311 एवढे कोरोना असलेले (सक्रिय) रुग्ण उपचार घेत आहेत.

बेडची मुबलक व्यवस्था-

आज स्थितीत जिल्ह्यामध्ये 1 हजार 138 एवढे जिल्हा रुग्णालयाचे बेड ( खाटा) कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. बीड जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे 30 लाखाच्या घरात आहे. एकूण लोकसंख्येच्या तुलनेत बीड जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती जिल्हा प्रशासनाच्या आवाक्यात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, असे असले तरी नागरिकांनी नियम पाळले नाही तर पुन्हा बीड जिल्ह्यात लॉकडाऊन लावावे लागेल. त्यामुळे परिस्थिती आवाक्यात आहे, तोपर्यंतच बीड जिल्हावाशियांनी कोरोनाच्या संदर्भातील नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Last Updated : Feb 24, 2021, 6:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.