ETV Bharat / state

छावणी चालकांना अखेर दणका; १८ जणांना कारणे दाखवा नोटीस

बीड तालुक्यातील कोल्हारवाडी येथील छावणी तपासणीनंतर बीड जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले. जिल्हा प्रशासनाने एका छावणीवर कारवाई केल्यानंतर तातडीने छावण्यांमधील जनावरांची संख्या १६ हजाराने कमी झाली.

छावणी चालकांना अखेर दणका
author img

By

Published : May 14, 2019, 11:24 PM IST

बीड - जिल्ह्यातील छावण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा होत असल्याचे समोर आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने छावणी माफियांना दणका देण्याचे काम सुरू केले आहे. मंगळवारी १८ छावण्या चालकांना कारणे दाखवा नोटीस जिल्हा प्रशासनाने बजावली आहे. नुकत्याच झालेल्या तपासणीत जनावरांची संख्या वाढवून लावलेल्या छावण्यांना काळ्या यादीत का टाकू नये, अशी विचारणा नोटीसद्वारे जिल्हा प्रशासनाने छावणी माफियांना केली असून त्यांचे धाबे दणाणले आहेत. चारा छावण्यांमध्ये काळाबाजार करण्यामध्ये बीड तालुका सर्वात पुढे आहे.

छावणी चालकांना अखेर दणका

विशेषतः बीड तालुक्यातील छावण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ गडबड असल्याचे तपासणीत समोर आले आहे. राजकीय पक्षाशी संबंधित असलेल्या काही कार्यकर्त्यांच्या छावण्यांना प्रशासनातील अधिकाऱ्यांनी पाठबळ दिल्याने जनावरांची संख्या वाढवून दाखवली जात होती. बीड तालुक्यातील कोल्हारवाडी येथील छावणी तपासणीनंतर बीड जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले. जिल्हा प्रशासनाने एका छावणीवर कारवाई केल्यानंतर तातडीने छावण्यांमधील जनावरांची संख्या १६ हजाराने कमी झाली. छावण्यांच्या माध्यमातून लाखो रुपयाला सरकारला गंडा घालून स्वतःची तुंबडी भरून घेणारी एक टोळी बीड तालुक्यात सक्रिय आहे. अशा १८ चारा छावण्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांनी दिले आहेत.
ज्या संस्थांना नोटीस बजावण्यात येणार आहे त्या संस्थांकडून जनावरांची संख्या अचानक घसरली कशी याचा खुलासा मागविण्यात येणार असून त्यासोबतच संस्थेवर फौजदारी गुन्हे, संस्था काळ्या यादीत टाकणे, संस्थेची देयके ११ मे अंतिम मानून देयके देणे आणि दंडात्मक कारवाई संदर्भाने खुलासा मागविण्यात येणार आहे. नोटीस दिलेला संस्थांना सात दिवसात उत्तर द्यावे लागणार आहे. यामुळे चारा छावणी काळाबाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

नोटीस दिलेल्या संस्थांची नावे पुढील प्रमाणे -
ज्ञानेश्वर महिला दूध व्यावसायिक संस्था, खंडाळा डोईफोडवाडी, गुरुदत्त सेवाभावी संस्था बीड डोईफोडवाडी, ज्ञानेश्वर महिला दूध व्यावसायिक संस्था खंडाळा सानपवाडी, गुरुदत्त सेवाभावी संस्था बीड सोनपेठवाडी, गुरुदत्त सेवाभावी संस्था बीड, खर्डेवाडी, गुरुदत्त सेवाभावी संस्था शिवराज्यवाडी, चंपावती मल्टीपर्पज डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट बीड संचलित खंडाळा, दत्तकृपा दुग्ध व्यावसायिक सहकारी संस्था धवाज्याचीवाडी, शिवगर्जना ग्रामीण शिक्षण संस्था करमटा खर्डेवाडी, भैरवनाथ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था खांबालिंबा तालुका शिरूर कासार, मत्स्यगंधा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था धानोरा रोड बीड सौंदाणा, भैरवनाथ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था खालापुरी तालुका शिरूर कासार ढेकनमोहा, मत्स्यगंधा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था धानोरा रोड बीड पाली, भैरवनाथ बहुउद्देशीय सेवा संस्था खांबालिंबा तालुका शिरूर कासार, मत्स्यगंधा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था धानोरा बीड इमामपूर, या संस्थांना बीड जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली असून वरील संस्था काळ्या यादीत टाकने अथवा फौजदारी गुन्हे दाखल का करू नयेत अशी विचारणा केली आहे.

Intro:छावणी माफियांना दणका; 18 छावणी चालकांना प्रशासनाने बजावली कारणे दाखवा नोटीस

बीड- जिल्ह्यातील छावण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा होत असल्याचे समोर आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने छावणी माफियांना दणका देण्याचे काम सुरू केले आहे. मंगळवारी 18 छावण्या चालकांना कारणे दाखवा नोटीस जिल्हा प्रशासनाने बजावली आहे. नुकत्याच झालेल्या तपासणीत जनावरांची संख्या वाढवून लावलेल्या छावण्यांना काळा यादीत का टाकू नये अशी विचारणा नोटीसद्वारे जिल्हा प्रशासनाने छावणी माफियांना केली असून त्यांचे धाबे दणाणले आहेत. चारा छावण्यांमध्ये काळाबाजार करण्यामध्ये बीड तालुका सर्वात पुढे आहे.

Body:विशेषतः बीड तालुक्यातील छावण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ गडबड असल्याचे तपासणीत समोर आले आहे. राजकीय पक्षाशी संबंधित असलेल्या काही कार्यकर्त्यांच्या छावण्यांना प्रशासनातील अधिकाऱ्यांनी पाठबळ दिल्याने जनावरांची संख्या वाढवून दाखवली जात होती. बीड तालुक्यातील कोल्हारवाडी येथील छावणी तपासणीच्या नंतर बीड जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले. जिल्हा प्रशासनाने एका छावणीवर कारवाई केल्यानंतर तातडीने छावण्यांमधील जनावरांची संख्या 16 हजाराने कमी झाली. छावण्यांच्या माध्यमातून लाखो रुपयाला सरकारला गंडा घालून स्वतःची तुंबडी भरून घेणारी एक टोळी बीड तालुक्यात सक्रिय आहे. अशा 18 चारा छावण्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांनी दिले आहेत. ज्या संस्थांना नोटीस बजावण्यात येणार आहे त्या संस्थांकडून जनावरांची संख्या अचानक घसरली कशी याचा खुलासा मागविण्यात येणार असून त्यासोबतच संस्थेवर फौजदारी गुन्हे, संस्था काळ्या यादीत टाकणे, संस्थेची देयके 11 मे अंतिम मानून देयके देणे आणि दंडात्मक कारवाई संदर्भाने खुलासा मागविण्यात येणार आहे.

Conclusion:नोटीस दिलेला संस्थांना सात दिवसात उत्तर द्यावे लागणार आहे यामुळे चारा छावणी काळाबाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत

नोटीस दिलेल्या संस्थांची नावे पुढील प्रमाणे-
ज्ञानेश्वर महिला दूध व्यावसायिक संस्था, खंडाळा डोईफोडवाडी, गुरुदत्त सेवाभावी संस्था बीड डोईफोडवाडी , ज्ञानेश्वर महिला दूध व्यावसायिक संस्था खंडाळा सानपवाडी, गुरुदत्त सेवाभावी संस्था बीड सोनपेठवाडी , गुरुदत्त सेवाभावी संस्था बीड, खर्डेवाडी, गुरुदत्त सेवाभावी संस्था शिवराज्यवाडी, चंपावती मल्टीपर्पज डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट बीड संचलित खंडाळा, दत्तकृपा दुग्ध व्यावसायिक सहकारी संस्था धवाज्याचीवाडी, शिवगर्जना ग्रामीण शिक्षण संस्था करमटा खर्डेवाडी, भैरवनाथ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था खांबालिंबा तालुका शिरूर कासार, मत्स्यगंधा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था धानोरा रोड बीड सौंदाणा, भैरवनाथ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था खालापुरी तालुका शिरूर कासार ढेकनमोहा, मत्स्यगंधा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था धानोरा रोड बीड पाली, भैरवनाथ बहुउद्देशीय सेवा संस्था खांबालिंबा तालुका शिरूर कासार, मत्स्यगंधा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था धानोरा बीड इमामपूर, या संस्थांना बीड जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली असून वरील संस्था काळया यादीत टाकने अथवा फौजदारी गुन्हे दाखल का करू नयेत अशी विचारणा केली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.