ETV Bharat / state

औरंगाबादेत कुऱ्हाडीने वार करून तरुणाची हत्या - aurangabad murder news

औरंगाबादेतील उस्मानपुरा भागात तरुणावर धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली आहे. जुन्या वादातून हत्या झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

औरंगाबादेत कुऱ्हाडीने वार करून तरुणाची हत्या
author img

By

Published : Oct 31, 2019, 2:30 PM IST

Updated : Oct 31, 2019, 4:48 PM IST

औरंगाबाद - हॉटेलमध्ये चहा पित बसलेल्या तरुण ठेकेदाराच्या डोक्यात धारदार किऱ्हाडीने वार करून हत्या करण्यात आली. शहरातील उस्मानपुरा भागातील शहानूरमिया दर्गा परिसरात बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. शेख सुभान शेख अमिर (वय 37) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून तो उस्मानपुरा येथील शम्सनगरमधील रहिवासी आहे.

औरंगाबादेत कुऱ्हाडीने वार करून तरुणाची हत्या

सुभान बुधवारी रात्री उस्मानपुरा भागातील शहानुरमिया दर्गा जवळील रमजानी हॉटेल येथे मित्रांसह चहा पित गप्पा मारत बसला होता. त्याच दरम्यान तेथे शेख नईम शेख सलीम उर्फ गोरू, शेख अलीम शेख सलीम उर्फ बच्चू, शेख समीर शेख सलीम हे तिघे भाऊ हॉटेलमध्ये आले. काही समजण्याच्या आतच गोरूने स्वतः सोबत आणलेल्या धारधार कुऱ्हाडीने पाठीमागून सुभानच्या डोक्यात वार केले. कुऱ्हाडीच्या घातक प्रहाराने रक्तबंबाळ होऊन सुभान जमिनीवर कोसळला आणि बेशुद्ध झाला होता. नागरिकांनी त्याला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, रात्री दोन वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक धनके करीत आहेत.

महिनाभरापूर्वी झाला होता वाद -

मृत सुभानला ३ मुली आणि २ मुले आहेत. सुभान आणि शेख परिवार हे समोरा-समोरच राहतात. महिनाभरापूर्वी लहान मुलांच्या खेळण्यावरून दोन्ही परिवारात वाद झाला होता. तो वाद पोलिसातही गेला होता. मात्र, काही ज्येष्ठांच्या मध्यस्थीनंतर प्रकरण मिटले होते. मात्र, गोरूच्या मनात त्या भांडणाचा राग होता. त्याच रागातून ही हत्या झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Intro:हॉटेलमध्ये चहा पित बसलेल्या तरुण ठेकेदारांच्या डोक्यात धारदार किऱ्हाडीने वार करून हत्या करण्यात आल्याची थरारक घटना बुधवारी रात्री साडेदहा च्या सुमारास शहरातील उस्मानपुरा भागातील शहानुरमिया दर्गा परिसारत घडली आहे.
शेख सुभान शेख अमिर वय-37 (रा.समशनगर, उस्मानपुरा) असे हत्या झालेल्या तरुण ठेकेदाराचे नाव आहे.

Body:बुधवारी रात्री सुभान हा उस्मानपुरा भागातील शहानुरमिया दर्गा जवळील रमजानि हॉटेल येथे मित्रासह चहा पित गप्पा मारत बसला होता.त्याच दरम्यान तेथे शेख नईम शेख सलीम उर्फ गोरू, शेख अलीम शेख सलीम उर्फ बच्चू, शेख समीर शेख सलीम हे तिघे भाऊ हॉटेलमध्ये आले व काही समजण्याच्या आतच गोरूने स्वता सोबत आणलेल्या धारधार कुऱ्हाडीने पाठीमागून सुभानच्या डोक्यात वार केले कुऱ्हाडीच्या घातक प्रहाराने रक्तबंबाळ होऊन सुभान जमिनीवर कोसळला व बेशुद्ध झाला होता.त्यास नागरिकांनी तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र रात्री दोन वाजेच्या सुमारास सुभान ची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास उपनिरीक्षक धनके करीत आहेत.
------------------
महिनाभरापूर्वी झाला होता वाद

मृत सुभान ला तीन मुली आणि दोन मुले आहेत. सुभान आणि शेख परिवार हे सामोरा- समोरच राहतात महिनाभरापूर्वी लहानमुलांच्या खेळण्यावरून दोन्ही परिवारात वाद झाला होता.तो वाद पोलिसातही गेला होता मात्र समाजच्या प्रतिष्ठिताच्या मध्यस्थी नंतर प्रकरण मिटले होते. मात्र गोरूच्या मनात त्या भांडणाचा राग होता त्याच रागातून ही हत्या झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.Conclusion:
Last Updated : Oct 31, 2019, 4:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.