ETV Bharat / state

औरंगाबाद : चाकू हल्ल्यात तरुणाचा खून, चौघे अटकेत - औरंगाबाद पोलीस बातमी

पूर्ववैमनस्यातून एका तरुणाने चौघांवर धारदार चाकूने हल्ला केला. यात एकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 10 मार्च) रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.

danish
दानिश
author img

By

Published : Mar 10, 2021, 3:15 PM IST

Updated : Mar 10, 2021, 5:25 PM IST

औरंगाबाद - पूर्ववैमनस्यातून एका तरुणाने चौघांवर धारदार चाकूने जीवघेणा हल्ला केला. यात 22 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. 10 मार्च) साडेबारा वाजेच्या सुमारास अंगूरी बाग परिसरात घडली. पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवत आरोपींना अटक केली आहे. परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

माहिती देताना पोलीस निरीक्षक

सय्यद दानिशोद्दीन सय्यद शाफिओद्दीन (वय 22 वर्षे, रा.अंगुरीबाग), असे मृत तरुणाचे नाव आहे. तर शेख सलीम, शेख बाबा, शेख जब्बार, अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्लेखोर नितीन उर्फ गब्या भास्करराव खंडागळे (वय-27 वर्षे, रा.अंगुरीबाग)सह त्याची आई, बहीण व भावाला पोलिसांनी अटक केली आहे.

घटनाक्रम

याबाबत अधिक माहिती अशी की, जखमी शेख जब्बार उर्फ शम्मू सोबत आरोपी नितीनचा दोन महिन्यांपूर्वी वाद झाला होता. तेव्हापासून गब्याच्या मनात खुन्नस होती. मंगळवारी रात्री अंगुरीबाग भागात बाबा, जब्बार आणि सलीम हे तिघे गप्पा मारत थांबले होते. दानिश बाजूला असलेल्या एका घराच्या ओट्यावर बसलेला होता. दरम्यान, तेथे आरोपी गब्या आला व त्याने धारदार चाकू काढत जब्बारवर हल्ला चढवला सलीम आणि बाबा यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता गब्याने त्यावर देखील वार केले. हे पाहून बाजूला मोबाईल बघत बसलेला दानिश तेथे आला व भांडण सोडवत असताना गब्याने धारदार चाकू दानिशच्या छातीत भोसकले रक्तबंबाळ अवस्थेत तो जमिनीवर कोसळला. आरडाओरड झाल्याने गब्याने तेथून पळ काढला. परिसरातील नागरिकांनी चौघा जखमींना रुग्णालयात हलविले. मात्र, चौघांतील दानिशचा मृत्यू झाला. ही बाब समजताच पोलिसांनी घटनस्थळी धाव घेत आरोपी गब्या त्याची आई, बहीण व भावाला अटक केली. घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा तगडा फौजफाटा परिसरात तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणी क्रांतिचौक पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - विशेष : उज्वला योजनेंतर्गत मिळालेले गॅस झाले शोभेची वस्तू, लाभार्थ्यांना परवडेना दर

हेही वाचा - शहरातील कोरोना निर्बंध वाढले, पर्यटनस्थळ चार एप्रिलपर्यंत बंद

Last Updated : Mar 10, 2021, 5:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.