पैठण (औरंगाबाद) - एका 18 वर्षीय युवकाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना पैठण तालुक्यातील मुरमा येथे 27 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास घडली. त्यापूर्वी युवकाने व्हाट्सअॅपवर पप्पा, भैया, दीदी, जीजू तसेच सर्व जवळील मित्रांची माफी मागत असल्याचे स्टेटस ठेवले होते. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.
विहिरीत उडी घेऊन आत्महत्या -
पैठण तालुक्यातील मुरूमा येथील युवक श्रीनाथ प्रल्हाद मापारी (18) या युवकाने मुरमा शिवारातील स्वतःच्या शेतात असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या युवकाच्या मित्रांनी त्याच्या व्हाट्सअॅप स्टेटसवरचा मजकूर बघितल्यानंतर त्याची शोधाशोध सुरू केली असता, शेवटी त्यांच्या स्वतःच्या शेतामधील विहिरीत त्याचा मृतदेह आढळला. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
हेही वाचा - मुंबई: अश्लील प्रँक व्हिडिओमधून ४ महिन्यात २ कोटींची कमाई; तीन यूट्यूबरला अटक