औरंगाबाद - कन्नड तालुक्यातील जवळी बुद्रुक येथे कपाशी चुरा करण्याच्या यंत्रामध्ये अडकून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. वाल्मिकी सोनवणे (३६), असे मृताचे नाव असून गुरुवारी (३० एप्रिल) सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
वाल्मिकी सोनवणे हे चापानेर शिवारातील नानासाहेब पवार यांच्या शेतात ट्रॅक्टरवरील मशीनने कपाशी चुरा करण्याचे काम करत होते. त्यावेळी यंत्रामध्ये बिघाड झाला. चालक गणेश सुदाम गायके हे ट्रॅक्टर चालवत होते. त्यामुळे ट्रॅक्टर मालक वाल्मिक यांनी मशीनची दुरुस्ती करत होते. त्यावेळी मशीनमध्ये अडकून त्यांच्या पोटाला व छातीला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी चापानेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. चापानेर येथील प्राथामिक आरोग्य केंद्रामध्ये शवविच्छेदन करण्यात आले व देवगाव रंगारी पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .
कन्नड येथे यंत्रामध्ये अडकून शेतकऱ्याचा मृत्यू
औरंगाबादेतील जवळी बुद्रुक येथे यंत्रामध्ये अडकून एका तरुणाचा मृत्यू झाला असून वाल्मिक सोनवणे असे मृताचे नाव आहे.