ETV Bharat / state

Aurangabad Year Ender 2021 : लसीकरणाचा नव्या पॅटर्नसह 'या' घटनांमुळे चर्चेत राहिला औरंगाबाद जिल्हा, वाचा सविस्तर...

लसीकरण टक्केवारी वाढवण्याचे आव्हान जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्यासमोर होते. त्यावेळी काही कठोर नियम लावण्यात आले. जे नंतर औरंगाबाद पॅटर्न म्हणून पुढे आले. ज्यामध्ये लस न घेणाऱ्या नागरिकांना रेशन, पेट्रोल देण्यास आणि प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली. लस घेणाऱ्या नागरिकांना पेट्रोल देणाऱ्या पंप चालकांवर कारवाई करण्यात आली.

author img

By

Published : Dec 29, 2021, 3:59 PM IST

Updated : Dec 29, 2021, 5:39 PM IST

District Year Ender
District Year Ender

औरंगाबाद - 2021 वर्ष औरंगाबादच्या दृष्टीने वेगळेच राहील आहे. विशेषतः कोरोनाबाबत निर्बंध असो, की लसीकरण मोहिमेबाबत राबवलेल्या योजना. राज्यात औरंगाबाद पॅटर्न म्हणणे गाजले. इतिहासात पहिल्यांदाच शहराला केंद्रात मंत्रिपद मिळाल्याने आनंद व्यक्त झाला. तर राज्याला हादरा देणारे गुन्हे देखील घडले. औद्योगिक नगरी समजल्या जाणाऱ्या या भागात नवा उद्योग उभारी येऊ शकला नाहीच, तर शेतकरी आत्महत्या थांवण्यात प्रशासनाला अपयश मिळाले.

  1. राज्याला मिळाला औरंगाबाद पॅटर्न : कोरोना लसीकरण राज्यभर सुरू असताना औरंगाबाद जिल्हा लसीकरणाच्याबाबत मागे होता. लसीकरण टक्केवारी वाढवण्याचे आव्हान जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्यासमोर होते. त्यावेळी काही कठोर नियम लावण्यात आले. जे नंतर औरंगाबाद पॅटर्न म्हणून पुढे आले. ज्यामध्ये लस न घेणाऱ्या नागरिकांना रेशन, पेट्रोल देण्यास आणि प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली. लस घेणाऱ्या नागरिकांना पेट्रोल देणाऱ्या पंप चालकांवर कारवाई करण्यात आली. देशात पहिल्यांदाच पेट्रोलपंपवर लसीकरण मोहीम राबविण्यात आली. तर धार्मिक स्थळावर लसीकरण केले गेले. याचा उपयोग झाला आणि लसीकरण केंद्रांवर गर्दी झाली. हे सर्व प्रयोग देशाला आणि राज्याला औरंगाबादने दिले.
    कोविड केअर सेंटर
    कोविड केअर सेंटर
  2. बोगस प्रमाणपत्र देणारे रॅकेट उघड : आरोग्य यंत्रणेत नवनवे प्रयोग राज्यभर गाजले. तर दुसरी कडे आरोग्य सेवक आणि अधिकाऱ्यांनी याच माध्यमातून नागरोकांची फसवणुक झाल्याच देखील उघड झाल. कोरोना रुग्णांचा उच्चांक असताना रेमडीसीवर इंजेक्शनचा काळाबाजर आरोग्य सेवकांनी केल्याच उघड झालं. तर लसीकरण बाबत सक्ती करताच आरोग्य अधिकाऱ्याने काही कर्मचाऱ्यांना हाताशी घेऊन पैसे घेऊन लस न घेताच नागरिकांना लसीकरण प्रमाणपत्र जारी केले. या प्रकरणी चौघांना पोलिसांनी अटक केले. तर जवळपास 250 जणांना प्रमाणपत्र जारी केल्याची माहिती समोर आली.
    महानगरपालिका कार्यालय
    महानगरपालिका कार्यालय
  3. खुनांमुळे हादरले राज्य : एका माथेफिरू तरुणाने चौधरी कॉलनी भागात घरात घुसून धारदार चाकूने तिघांची हत्या केल्याची धक्कादायक घटना सप्टेंबर महिन्यात घडली. तर सिडको भागात प्रा. राजन शिंदे यांचा त्यांच्याच अल्पवयीन मुलाने खून केला. त्यानंतर डिसेंबर महिण्यात वैजापूर तालुक्यात प्रेमविवाह करणाऱ्या गर्भवती बहिणीची भावाने आणि आईने क्रूर हत्या केली. या घटनेत मृत महिलेचा नवरा थोडक्यात बचावला या आणि अशा काही हत्यांमुळे शहरात दहशद निर्माण झाली.
  4. उद्योग आणि पर्यटन क्षेत्रात निराशा : मराठवाड्यातील सर्वात मोठे शहर आणि राजधानी म्हणून औरंगाबादची ओळख आहे. जगाच्या पाठीवर पर्यटननगरी आणि ऑटोमोबाइल हब अशी दुहेरी ओळख औरंगाबादची आहे. मात्र या दोन्ही क्षेत्रात 2021 मध्ये औरंगाबादच्या पदरात काहीच पडले नाही. ठाकरे सरकारकडून औरंगाबादकरांना खूप अपेक्षा होत्या आणि आहेत. मात्र वर्षभरात पूर्ण निराशा पदरी पडली आहे. औरंगाबाद हे राज्याची पर्यटन राजधानी म्हणून ओळख जाते. शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे पर्यावरण व पर्यटन मंत्री आहेत तरीही औरंगाबादच्या पदरात काहीच पडले नाही. उद्योगमंत्री सुभाष देसाई हे औरंगाबादचे पालकमंत्री आहे. औरंगाबादला पंचतारांकित शेंद्रा एमआयडीसी आहे. त्याचबरोबर दिल्ली-मुंबई कॉरिडॉर या ठिकाणाहून जात असताना औरंगाबादला गेल्या वर्षभरात एकही मोठा उद्योग आला नाही. यातून उद्योगांमध्येही औरंगाबादची निराशाच झाल्याचे स्पष्ट होत. औरंगाबादला जे हक्काचे मिळणार होते ते केंद्रीय क्रीडा विद्यापीठ देखील पुण्याला हलवल्याने शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातली मोठी हानी औरंगाबादची झाली आहे. तर अनेक वर्षांपासून रखडलेले संत पीठ मात्र सुरू झाले आहे.
    जिल्हाधिकारी कार्यालय
    जिल्हाधिकारी कार्यालय
  5. पहिल्यांदाच मिळाले केंद्रीय मंत्रिपद : देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात औरंगाबादची वेगळी ओळख आहे. राज्यात मंत्रिपद मिळालेल्या जिल्ह्याला केंद्रात मंत्रिपद मिळाले नव्हते. मात्र खासदार डॉ. भागवत कराड यांच्या माध्यमातून केंद्रात मंत्रिपद मिळाले. या निमित्ताने भाजपाने शहरात असेलला शिवसेनेचा दबदबा कमी करण्याचा प्रयत्न केला. तर औरंगाबाद- पुणे या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली असून नव्या वर्षात या मार्गाने नागरिकांना प्रवास करता येणार आहे. नागपूर मुंबई रेल्वे मार्गाच्या कामात दिल्ली नंतर औरंगाबादेत केंद्र होणार आहे.
    खासदार डॉ. भागवत कराड
    खासदार डॉ. भागवत कराड
  6. यंदा धरण भरले तर शहरात अनेक ठिकाणी शिरले पाणी : जून महिन्यात पावसाळा सुरू झाला तरी पहिले दोन ते अडीच महिने औरंगाबादेत पावसाचे प्रमाण खूप कमी होत. त्यामुळे यंदा पाऊस कमी होईल, अशी भीती वर्तवली जात होती. मात्र पावसाला दमदार सुरू झाली सुरुवात झाली आणि त्यामध्ये जायकवाडी धरण पुन्हा एकदा भरले. खालच्या भागात पाणी देखील सोडण्यात आले ही चांगली बाब असली, तरी त्याच वेळेस मात्र शहरात विक्रमी पावसाची नोंद झाली आणि शहरातील अनेक सखल भागात पाण्याने शिरकाव केला. व्यापाऱ्यांचे नुकसान झाले तर काही ठिकाणी पूल वाहून गेले, वैजापूर - सिल्लोड तालुक्यात वाहत्या पाण्यात दुचाकीस्वार वाहून गेला. या वर्षात अति पावसामुळे पिकांचेही मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले.
    जिल्ह्यातील धरण
    जिल्ह्यातील धरण
  7. मुस्लिम - धनगर आरक्षणाला झाली सुरुवात : मराठा आरक्षणा आंदोलनाची सुरुवात झालेल्या शहरात मुस्लिम आणि धनगर आरक्षण आंदोलनाच्या आंदोलनाची घोषणा सरत्या वर्षात झाली. डिसेंबर महिन्यात एमआयएम पक्षाने मुस्लिम समाजाच्या आरक्षण आंदोलनाला सुरुवात केली. तर धनगर आरक्षणासाठी महत्वाची बैठक पार पडली असून त्यात जानेवारी 2022 पासून धनगर आरक्षणासाठी राज्यात आंदोलनाला सुरुवात होण्याची घोषणा करण्यात आली.
  8. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उद्यान मुद्दा न्यायालयात : सिडको येथील प्रियदर्शनी उद्यानात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारक करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र तसे होत असताना होणारी वृक्षतोड याबाबत काही निसर्गप्रेमींनी न्यायालयात धाव घेतली. त्यावेळी या स्मारकात व्हीआयपी गेट आणि फूड प्लाझा करण्यास न्यायालयाने सक्त मनाई केली आहे. त्यामुळे स्मारकाच्या नियोजनात बदल करावा लागणार आहे. न्यायालयाच्या मदतीमुळे मोठी चपराक यानिमित्ताने बसली आहे.
    औरंगाबाद न्यायालय
    औरंगाबाद न्यायालय
  9. वर्षभरात 157 शेतकऱ्यांच्या आत्महत्या : मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबता थांबत नाही. वर्षभरात 805 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यात औरंगाबादेत 157 शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. मराठवाड्यातील उच्चांकी संख्या आहे. वर्षभरात टोमॅटोचे दर सातत्याने पडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

हेही वाचा - Solapur District Year Ender 2021 - कोरोना महामारीसह 'या' घटनांमुळे सोलापूर जिल्हा वर्षभर चर्चेत राहिला

Last Updated : Dec 29, 2021, 5:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.