ETV Bharat / state

Wrestling Tournament : आमखास मैदानावर कुस्तीचे मुकाबले; महाराष्ट्र केसरी आणि भारत केसरी यांच्यात लढत - MP Imtiaz Jalil

औरंगाबादेत नशामुक्तीचा प्रसार, प्रचार व संदेश देण्यासाठी आमखास मैदानावर ( Wrestling Tournament On Aamkhas Ground ) दिनांक १७ नोव्हेंबर दुपार नंतर कुस्ती स्पर्धेच्या महादंगलीत आयोजीत करण्यात आल्या आहेत. खासदार इम्तियाज संचलित दुआ फांडेशन तर्फे औरंगाबाद नशामुक्त व्हावा याकरिता कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ( Wrestling Tournament In Aurangabad) आहे.

kusti
कुस्ती
author img

By

Published : Nov 17, 2022, 11:10 AM IST

औरंगाबाद : खासदार इम्तियाज संचलित दुआ फांडेशन तर्फे औरंगाबाद नशामुक्त व्हावा याकरिता कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ( Wrestling Tournament In Aurangabad) आहे. नशामुक्तीचा प्रसार, प्रचार व संदेश देण्यासाठी आमखास मैदानावर ( Wrestling Tournament On Aamkhas Ground ) दिनांक १७ नोव्हेंबर दुपार नंतर कुस्ती स्पर्धेच्या महादंगलीत आयोजीत करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र केसरी विरूद्ध भारत केसरी : शहरात पहिल्यांदाच पंजाब येथून भारत केसरी प्रविण भोला, सोलापूर येथून महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख यांच्यात महामुकाबला पहायला मिळणार ( Fight between Maharashtra Kesari and Bharat Kesari )आहेत. यासह पंजाब, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, हरयाणा, दिल्ली आणि महाराष्ट्रातील सर्व प्रसिध्द व नामवंत कुस्तीपटू स्पर्धेत सहभागी होणार आहे. अशी माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी ( MP Imtiaz Jalil ) दिली.

औरंगाबाद नशामुक्त : नशामुक्ती करिता आयोजित कुस्ती स्पर्धेत औरंगाबादच्या इतिहासात प्रथमच भारत केसरी व महाराष्ट्र केसरीचे मानकरी पहिलवान खेळणार आहेत. विशेषत: आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवरील दिग्गज कुस्तीपटू सहभागी होणार ( Legendary wrestlers participate In Tournament ) असल्याने या रंगतदार कुस्ती सामन्यांची देशपातळीवर चर्चा सुरु झाली आहे. महाराष्ट्रातील कानाकोपर्‍यातून मोठ्या उत्साहाने आपआपल्या पहिलवानला प्रोत्साहन देण्यासाठी प्रेक्षक सहभागी होणार आहे.

दिग्गज पहिलवानांच्या उत्कृष्ट खेळी : दिग्गज पहिलवानांच्या उत्कृष्ट खेळी व डावपेचामुळे कुस्ती स्पर्धेचे सर्व सामने रंगतदार तर होणारच याशिवाय यास्पर्धेत अनेक इतिहास रचले जाणार असल्याचे मत अनेक कुस्तीप्रेमी व वस्तादांनी व्यक्त केले आहे. याशिवाय महिला कुस्तीपटु सुध्दा सहभागी होणार आहे. कुस्ती स्पर्धेत होणारे सर्व सामने हे एकता कुस्ती केंद्राचे राष्ट्रीय कुस्ती कोच मुख्तार पटेल, तज्ञ पंच व वस्तांदांच्या निगरानी व मार्गदर्शनाखाली होणार आहे. विजेता कुस्तीपटू मानाच्या गदेचा मानकरी ठरणार आहे. बक्षिस वितरण पोलीस आयुक्त निखिल गुप्ता व इतर मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.