यवतमाळ- मैत्रिणीच्या भावाने प्रेमजाळ्यात ओढून केलेल्या अत्याचारामुळे अल्पवयीन मुलीवर कुमारी माता बनण्याची वेळ आली आहे. या प्रकरणी पीडितेने अवधुतवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून संशयित तरुणाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
नीलेश शैलेश पुरी (व.२१, रा. मुलकी) असे संशयित तरुणाचे नाव आहे. पीडित विद्यार्थिनी इयत्ता अकरावीची विद्यार्थिनी आहे. शिकवणी वर्गाला जात असताना मैत्रिणीच्या भावासोबत तिची ओळख झाली. नीलेशने तिला प्रेमजाळ्यात ओढून २८ फेब्रुवारी २०१९ ला जांब मार्गावरील जंगल परिसरात नेले. तिथे तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर विद्यार्थिनीने तरुणाशी संपर्क तोडला.
५ जूनला कॉलेज सुरू झाल्यानंतर तिने घडलेला प्रकार मैत्रिणीला सांगितला. मात्र, तिने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे तरुणीने तिच्याशी बोलणेदेखील बंद केले. पोटात दुखत असल्याने आई तिला स्त्री रोग तज्ज्ञाकडे घेवून गेली. त्यात तपासणी अंती मुलगी गर्भवती असून प्रसुती होणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर मुलीच्या आईने तरुणाच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्याच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. या प्रकरणी अवधुतवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून नीलेश पुरी याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
हेही- विद्युत स्पर्श होऊन ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू