ETV Bharat / state

तीन महिन्याच्या बाळाला 'घाटी'त सोडून महिलेचा पोबारा

थोडा वेळ बाळाला सांभाळा, मी लगेच येते म्हणत एका महिलेने घाटी रुग्णालयातून पळ काढला. पोलीस त्या बाळाच्या आईचा शोध घेत आहेत.

बाळासह सुरक्षा रक्षक
बाळासह सुरक्षा रक्षक
author img

By

Published : Oct 11, 2020, 8:38 PM IST

औरंगाबाद - घाटी रुग्णालयातील ऑपरेशन थिएटर क्रमांक 1 समोर एका व्यक्तीकडे बाळ देत माझ्या मुलाला थोडावेळ सांभाळा, मी लगेच येते म्हणत एका महिलेने पोबारा केला. ही घटना रविवारी (दि. 11 ऑक्टोबर) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली आहे.

त्या व्यक्तीने बराच वेळ झाल्यानंतरही बाळाची आई परत न आल्याने, त्या बाळाला तेथील मेस्कोच्या महिला सुरक्षा रक्षकांकडे सोपविले. सुरक्षा रक्षकांनी ही माहिती प्रशासनाला दिली. घाटी प्रशासनाने बाळाला वॉर्ड क्रमांक 24 मध्ये दाखल केले असून, याबाबत बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यासंदर्भात घाटीतील वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे यांनी सांगितले की, हे बाळ अंदाजे अडीच-तीन महिन्याचे आहे. बाळाला बालरोग विभागात दाखल केले आहे. पोलीस बाळाच्या आईचा शोध घेत आहे.

हेही वाचा - आयपीएलच्या क्रिकेट सामन्यावर सट्टा, चौघे पोलिसांच्या जाळ्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.