ETV Bharat / state

'जन्मोजन्मी हाच पती मिळो' म्हणत महिलांनी साजरी केली वटपौर्णिमा - Women

शहरातील विविध भागात आज वडाच्या झाडाला महिलांनी धाग्याचे सात फेर बांधले आणि तिथे उपस्थित असणाऱ्या महिलांना वाण दिले. तर याचबरोबर हिरव्या बांगड्या, हळकुंड, सुपारी, बदाम यासह आंबा वाहून ही पूजा करण्यात आली आहे.

'जन्मोजन्मी हाच पती मिळो' म्हणत महिलांनी साजरी केली वटपौर्णिमा
author img

By

Published : Jun 16, 2019, 8:22 PM IST

औरंगाबाद - शहरातील महिलांनी वटपौर्णिमा पारंपरिक पध्दतीने उत्साहात साजरी केली आहे. जन्मोजन्मी हाच पती मिळो, अशी प्रार्थना करत शहरातील सर्वच भागांमध्ये महिलांनी आज वडाच्या झाडांची पूजा केली.

शहरातील विविध भागात आज वडाच्या झाडाला महिलांनी धाग्याचे सात फेर बांधले आणि तिथे उपस्थित असणाऱ्या महिलांना वाण दिले. तर याचबरोबर हिरव्या बांगड्या, हळकुंड, सुपारी, बदाम यासह आंबा वाहून ही पूजा करण्यात आली आहे. जुन्या पिढीतील महिलांबरोबरच नवीन पिढीतील महिलाही उत्साहाने वडाची पूजा करताना ठिकठिकाणी पाहायला मिळाल्या आहेत.

पौराणिक कथेनुसार सत्यवान आणि सावित्री यांच्या आयुष्यातील एका प्रसंगाभोवती हा पौर्णिमेचा दिवस गुंफला गेला आहे. आपल्या व्रताने पती सत्यवानाचे प्राण परत मिळविण्यासाठी सावित्रीने यमाला भाग पाडले होते, अशी आख्यायिका या सणाबद्दल सांगितली जाते.

'जन्मोजन्मी हाच पती मिळो' म्हणत महिलांनी साजरी केली वटपौर्णिमा

आजच्या आधुनिक युगात हा दिवस तितक्याच पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. हिंदू धर्मातील सण प्रथा परंपरा या निसर्गाच्या संस्कृतीशी जोडल्या गेलेल्या आहेत. जन्मोजन्मी हाच पती मिळावा या प्रार्थनेबरोबर वृक्षपुजा हा सुद्धा वटपौर्णिमेचा हेतू आहे.

Intro:पती-पत्नीचे नाते जन्मोजन्मी अखंड रहावे अशी प्रार्थना करत शहरातील महिलांनी वटपौर्णिमा पारंपारिक पध्दतीने उत्साहात साजरी केली. शहरातील सर्वच भागांमध्ये असणाऱ्या वडाच्या झाडांची पूजा करण्यासाठी महिलांनी आज मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

Body: पौराणिक कथेनुसार सत्यवान आणि सावित्री यांच्या आयुष्यात आलेल्या एका प्रसंगाभोवती हा पौर्णिमेचा दिवस गुंफला गेला. आपल्या पतिव्रत्याने सत्यवानाचे प्राण परत मिळविण्यासाठी सावित्रीने यमाला भाग पाडले अशी अख्यायिका या सणाबद्दल सांगितली जाते. आजच्या आधुनिक युगातही हा दिवस तितक्याच पारंपारिक पध्दतीने साजरा केला जातो.
हिंदू धर्मातील सण, प्रथा, परंपरा या निसर्गाच्या संस्कृतीशी जोडले गेल आहेत. जन्मोजन्मी हाच पती मिळावा याचबरोबर वृक्षपूजा हासुध्दा वटपौर्णिमेचा हेतू आहे. शहरातील विविध भागात आज वडाच्या झाडाला महिलांनी धाग्याचे सात फेर बांधत तिथे उपस्थित असणाऱ्यां महिलांना वाण दिले. हिरव्या बांगड्या, हळकुंड, सुपारी, बदाम यासह आंबा वाहून ही पूजा करण्यात आली. जुन्या पिढीतील महिलांबरोबरच नवीन पिढीतील महिलाही उत्साहाने ही वडाची पूजा करताना ठिकठिकाणी दिसून येत होत्या.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.