ETV Bharat / state

सिद्धार्थनगरमध्ये भरधाव कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू - सिद्धार्थनगर कार अपघात बातमी

सिद्धार्थनगर परिसरातून दुचाकीवर जाणाऱ्या एका दाम्पत्याला भरधाव कारने धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Siddharthnagar car accident
सिद्धार्थनगर कार अपघात बातमी
author img

By

Published : May 1, 2021, 8:55 AM IST

औरंगाबाद - टीव्ही सेंटर भागातील सिद्धार्थनगर येथे भरधाव कारने दुचाकीस्वार दांपत्याला धडक दिल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. यामध्ये दुचाकी 50 ते 60 फूट अंतरापर्यंत फरफटत गेल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनिता प्रकाश शेळके (वय 45 रा. हडको), असे मृत महिलेचे नाव आहे.

सिद्धार्थनगर परिसरातून सुनीता व त्यांचे पती हे दुचाकीवरुन रस्ता ओलांडत होते. यावेळी एका भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामुळे त्यांची दुचाकी 50 ते 60 फूट फरफटत गेली. कारने दिलेल्या जोराच्या धडकेत सुनीता प्रकाश शेळके यांचा मृत्यू झाला. त्यानंतर घटनस्थळावरून कार चालकने पळून जाण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी कारचालक अमोल मधुकर कीर्तिकर (वय 20 रा. शिवशंकर कॉलनी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - दख्खनेतील महाराष्ट्र..! आयपीएस अधिकारी महेश भागवत यांच्या कार्याची तेलंगाणामध्ये छाप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.