औरंगाबाद - सध्या राज्यभरात थंडीची लहर सुरू आहे. हिवाळा संपण्याच्या तयारीत असताना थंडीत वाढ होऊ लागली आहे. पैठणमध्येही घनदाट धुक्याची चादर पसरल्यामुळे वातावरण आल्हाददायक झाले आहे. मात्र, धुक्याचे प्रमाण वाढत असून याचा परिणाम रब्बी हंगामातील पिकांवर होणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे.
![aurangabad](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-aur-1-winter-fog-script-mhc10028_19122019092255_1912f_1576727575_578.jpg)
हिरवाईने नटलेला अथांग असा नाथसागर आणि त्याच्या शेजारी गर्द हिरवी झाडी. सोबतच शेकडो एकर परिसरातील विस्तीर्ण अशा निसर्ग सौदर्याने नटलेल्या संत ज्ञानेश्वर उद्यानात पैठणकर अणि पर्यटक घनदाट धुक्याचा नजराना अनुभवताहेत. पहाटेपासून तर सकाळी ७ पर्यंत येथे माँर्निगवॉकसाठी येणाऱ्या नागरिकांच्या संख्येत वाढत होत असल्याचे दिसत आहे.
थंडी आणि धुक्यामध्ये नागरिक हरखले असले तरी, यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. सध्या गहु, हरभरा, ज्वारीच्या पिकांवर थंडीचा परिणाम होत असल्याने धुक्याचे प्रमाण वाढल्यास ही पिकं धुक्याची बळी होतात. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
हेही वाचा - वाईन शाॅपच्या मॅनेजरचा खून करणाऱ्या 'त्या' टोळीचा पर्दाफाश
खर्या अर्थाने आता गुलाबी थंडीला सुरुवात झाली आहे. सकाळी व रात्री वातावरण थंड असते. तर, अनेक ठिकाणी दाट धुके पडलेले पाहायला मिळते तरीसुध्दा दुपारी उष्मा जणवतो. थंडी आणि उष्म्यामुळे थंडी, ताप व खोकल्यासारखे साथीचे आजार वाढत आहेत. त्यामुळे या वातावरणात आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत.
हेही वाचा - पाय घसरल्याने डोंगरावरून पडून तरुणीचा मृत्यू; 'ते' स्वप्न अर्धवटच राहिले