औरंगाबाद - जुलै महिना अर्धा संपत आला तरी अद्याप मराठवाड्यात पावसाने हजेरी लावली नाही. पिण्याच्या पाण्याची समस्या देखील सर्वांना भेडसावत आहे. त्यात निर्मनुष्य ठिकाणी राहणाऱ्या प्राण्यांना देखील पाण्याची कमतरता जाणवत आहे. आता हे वन्यजीव मानवी वस्तीत येत आहेत. तसेच सिल्लोड तालुक्यात वन्य प्राण्यांकडून कोवळी पिके उध्वस्त केली जात आहेत.
हरणांचा त्रास वाढला : मराठवाड्यात पुन्हा एकदा पावसाने दांडी मारल्याने चिंता वाढली आहेत. काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली, मात्र त्याचा जोर अद्याप वाढला नाही. परिणामी शेती अडचणीत आली आहे. मात्र त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. माणसांना पाण्यासाठी त्रास होत असताना प्राण्यांना देखील पाण्यासाठी भटकावे लागत आहे. पाण्याच्या आणि अन्नाच्या शोधात हरणांचे कळप शेतांमध्ये येत आहेत. त्यामुळे कमी पावसात आलेली पिके देखील उधवस्त होत आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तर या संकटाचा सामना करावा कसा, असा प्रश्न त्यांना पडला आहे.
वन विभाग काही करेना : सिल्लोड तालुक्यातील रहिमाबाद परिसरात यंदा महत्त्वाचे दोन्ही नक्षत्र कोरडे गेल्याने, खरिपाची पेरणी लांबणीवर गेली. तर काही शेतकऱ्यांनी आषाढी एकादशीच्या नंतर पेरणी केली. त्यानंतर झालेल्या रिमझिम पावसाने आता पिक येत आहेत. परंतु वन्यप्राण्यांकडून पिके खाऊन फस्त केली जात आहेत. तसेच याबाबत नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल करुनही वनविभागाने मात्र केवळ बघ्याची भूमिका घेतली आहे. नुकसानीची पाहणी करुन पंचनामे न केल्यामुळे शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे. तर लवकरच बैठक घेऊन वनविभागाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
हेही वाचा -