ETV Bharat / state

Wife Murder by Husband : संशय घेऊन पतीकडून पत्नीची हत्या; पैठणमधील आरोपी पतीला मित्रासह अटक - Wife Murder by Husband paithan aurangabad

पहिली पत्नी घर सोडून जात नसल्याने पतीने संशय घेत धारदार शस्त्राने डोक्यावर वार करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना पैठण तालुक्यात घडली. ( Wife Murder by Husband ) पोलिसांनी आरोपी पती आणि त्याच्या मित्राला अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे.

Wife Murder by Husband Paithan Aurangabad

author img

By

Published : Mar 8, 2022, 7:14 PM IST

पैठण (औरंगाबाद) - पहिली पत्नी घर सोडून जात नसल्याने पतीने संशय घेत धारदार शस्त्राने डोक्यावर वार करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना पैठण तालुक्यात घडली. ( Wife Murder by Husband ) पोलिसांनी आरोपी पती आणि त्याच्या मित्राला अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे.

घर सोडावे म्हणून वाद -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे मृत महिलेसोबत 20 वर्षांपुर्वी लग्न झाले होते. त्यानंतर मुल बाळ न झाल्याने त्याने 10 वर्षांपुर्वी दुसरे लग्न केले. यानंतर तो वेगळा राहु लागला. तर मृत महिला ही सासरीच राहत होती. तिने सासरी राहु नये, सासरचे घर सोडुन द्यावे यासाठी आरोपी तिच्यावर संशय घेवून अधुन मधुन तिच्यासोबत वाद करत होता.

आधीही दिली होती मारण्याची धमकी -

मृत महिला पैठण येथील एमआयडीसी मध्ये काम करत होती. तु कंपनीत कामाला जावु नको, असे म्हणुन आरोपीने तिला मारहाण केली होती. तसेच तु जर गेली नाही तर एक ना एक दिवस तुझा काटा काढेन, असे म्हणुन धमकावत होता. तिच्याकडे आल्यावर तिच्यावर संशय घेवुन तिच्यासोबत वाद घालायचा. त्यानंतर रविवारी मध्यरात्री पैठण-औरंगाबाद रस्त्यावर खून करण्यात आला, अशी फिर्याद मृत महिलेच्या भावाने दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी पतीसह त्याच्या मित्राला ताब्यात घेतले. तपसाअंती दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - Bjp Morcha for Nawab Malik Resignation : नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी बुधवारी भाजपचा विराट मोर्चा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.