ETV Bharat / state

Financial currency : भारतीय नोटांवर गांधीजी; तर मुस्लिम राष्ट्राच्या चलनावर गणपती ? जाणून घ्या, कारण - भारतीय चलनावर गांधीजी

सध्या देशात आर्थिक चलन असणाऱ्या नोटांवर देवांचा फोटो असावा अशा राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. का असतात भारतीय नोटांवर गांधीजी ( Gandhiji is on Indian currency ) तर मुस्लिम राष्ट्राच्या चलनावर गणपती ( Ganapati on currency of Muslim nation ) ? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो.

Financial currency
Financial currency
author img

By

Published : Oct 30, 2022, 2:16 PM IST

औरंगाबाद : सध्या देशात आर्थिक चलन असणाऱ्या नोटांवर देवांचा फोटो असावा अशा राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र त्यावर राष्ट्रपिता महात्मा गांधी (Gandhiji is on Indian currency ) यांचाच फोटो आज पर्यंत लावण्यात येतो. मात्र त्यांचाच फोटो का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो. मात्र त्याची वैशिष्टपूर्ण कारण आहे. तर इंडोनेशिया सारख्या मुस्लिम राष्ट्रात गणपती बाप्पाचा फोटो ( Ganapati on currency of Muslim nation ) असलेले चलन अस्तित्वात होते. असे मत आंतरराष्ट्रीय अभ्यासक लेफ्टनंट कर्नल डॉ. सतीश ढगे यांनी व्यक्त केलं.

देश धर्मनिरपेक्ष राष्ट्र : भारतीय चलनावर म्हणजेच नोटांवर देश स्वतंत्र झाल्यावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटो वापरण्यात आला. कारण ते कोणत्या एका जाती धर्माचे नेतृत्व करत नव्हते. सर्व समावेशक अस त्यांचं कार्य होत. त्यांच्यामुळे देश स्वतंत्र झाला. भारत देश संपूर्ण हिंदू, मुस्लिम, सिख किंवा इसाई राष्ट्र नाही. भारताप्रमाणे पाकिस्तान मध्ये जिना यांचा फोटो लावण्यात आला तसे इतर काही राष्ट्रांमध्ये त्यांचे राष्ट्रपिता, किंवा अन्य काही ठळक वैशिष्ट्य असलेले फोटो वापरण्यात येतात. तसच देशासाठी केलेल्या कार्यामुळे महात्मा गांधी यांचे चित्र नोटांवर लावण्यात आले अशी माहिती आंतरराष्ट्रीय अभ्यासक लेफ्टनंट कर्नल डॉ सतीश ढगे यांनी दिली.

सतीश ढगे

नोट कशी असावी यासाठी आरबीआय घेते निर्णय : भारतीय चलन कसे असावे यासाठी आरबीआय निर्णय घेते. विशेष विभाग त्यासाठी असतो. कागद कसा असावा, त्यावर कोणते चित्र असावे याबाबत निर्णय घेऊन केंद्र सरकारला त्याबाबत माहिती दिली जाते. त्यानंतर केंद्र पुढील निर्णय घेते. देशाचे संविधान पाहता धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून जगभरात प्रचिती आहे. आता जर हिंदू देवी देवतांचे फोटो नोटांवर वापरले तर उद्या इतर धर्मीयदेखील तशी मागणी करू शकतात. आजपर्यंत चलनावरून कोणतेही वाद निर्माण झाले नाही. मात्र भविष्यात ते उद्भवण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे मत आंतरराष्ट्रीय अभ्यासक लेफ्टनंट कर्नल डॉ. सतीश ढगे यांनी व्यक्त केलं.

आपची मागणी राजकीय हेतूने : आम आदमी पक्षाला गुजरातमध्ये आगामी विधानसभा निवडणूक लढवायची असल्याने आपली प्रतिमा हिंदुत्ववादी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. राज्य आणि केंद्रात सत्ता असूनही जर ते निर्णय घेऊ शकले नाही तर त्याचा ठपका ठेवून भाजपची प्रतिमा खराब करण्याचे आणि त्यांची पकड सैल करण्याचे काम आम आदमी पार्टीला करायची आहे. त्यामुळे जातीचे कार्ड खेळण्याचा प्रयत्न करत असल्याचं डॉ ढगे यांनी सांगितलं.

इंडोनेशिया राष्ट्रात नोटांवर बाप्पाचा फोटो : गणपती बाप्पा आणि लक्ष्मीचा फोटो असावा अशी मागणी आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांनी केली मात्र इंडोनेशिया सारख्या इस्लामिक राष्ट्रात चलनावर गणपती बाप्पाचे फोटो वापरण्यात आला होता. त्यांच्यासोबत माजी शिक्षामंत्री आणि अभ्यास करणारा मुलगा याचा फोटो वापरण्यात आला आहे. शिक्षा विषयी असणारे धोरण दर्शवणारे चलन आहे. याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. चोला साम्राज्याचा भाग इंडोनेशिया होता. त्यामुळे संस्कृतीशी आधारित नोट होती, आता मात्र ती अस्तित्वात नाही असं मत डॉ. ढगे यांनी व्यक्त केलं.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.