औरंगाबाद - राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल सोमवारी समोर आले. अनेक ठिकाणच्या धक्कादायक निकालांसोबत काही ठिकाणचे मजेशीर निकालही चर्चेचा विषय ठरत आहेत. अशाच एका निकालाची सध्या राज्यभरात चर्चा होत आहे. ती म्हणजे एका उमेदवाराला केवळ एकच मत मिळाल्याची. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील भायगावगंगा येथील एका उमेदवाराला निवडणुकीत फक्त एकच मत मिळाले आहे.
मोतीराम माचे यांना मिळाले केवळ 'एक' मत
ग्रामपंचायत निवडणुकीत भायगंगा येथील वार्ड क्रमांक 3 मधून मोतीराम माचे यांनी पंढरीनाथ कदम यांच्याविरोधात निवडणूक लढविली. या वॉर्डातील मतदारांची संख्या 193 इतकी होती. निवडणुकीसाठी दोन्ही उमेदवारांनी चांगली मेहनत घेतली. सोमवारी या ग्रामपंचायतीचा निकाल हाती आला. यात पंढरीनाथ कदम यांना 191 तर मोतीराम माचे यांना फक्त एकच मत मिळाले. तसेच एक मत नोटाला मिळाले. माचे यांचे नाव वार्ड क्रमांक 1 मध्ये होते मात्र त्यांनी निवडणूक वार्ड क्रमांक 3 मधून लढवली, त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांनाही स्वतःला मतदान करता आलं नाही. मात्र वॉर्डातील एका चाहत्याने त्यांना मतदान केले.
न्यायालयात मागणार दाद
या निकालावर माचे यांनी नाराजी व्यक्त करत न्यायालयात दाद मागणार असल्याचे म्हटले आहे. ईव्हीएम यंत्रात गडबड असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर पंढरीनाथ कदम यांनी मात्र गेल्या दोन निवडणुकांपासून या वॉर्डातून विजय मिळवला आहे. गेल्यावेळीही विरोधातील उमेदवाराला एकच मत मिळाल्याचे कदम यांनी सांगितले आहे. वार्डातील कामे केल्यानेच माझा विजय झाल्याचं पंढरीनाथ कदम यांनी म्हंटले आहे.
मजेशिर निकाल! "या" उमेदवाराला मिळालेली मते पाहुन तुम्हीही माराल कपाळावर हात - candidate get only 'one' vote
ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात औरंगाबाद जिल्ह्यातील एका उमेदवाराला फक्त एकच मत मिळाले आहे. केवळ एकच मत मिळाल्याने या निकालाची राज्यभरात चांगलीच चर्चा होत आहे.