औरंगाबाद - पावसाने राज्यात थैमान ( Rain lashed the state ) घातले आहे, शेतकरी उध्वस्त ( farmer was devastated ) झालाय. मी अनेक ठिकाणी केली, परिस्थिती भयावह आहे. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी ( heavy rain ) वेळी शेतकऱ्याने मदत देण्याचे जाहीर केले होते. मात्र अजूनही संपूर्ण मदत पोहोचू शकली नाही. सध्या अनेक शेतात कमरेपर्यंत पाणी आहे. ओला दुष्काळ जाहीर करायला हवा. मात्र, कृषी मंत्री म्हणतात ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज नाही, स्वतः कृषी मंत्री गुडघा भर पाण्यात फिरताय. हा ओला नाही तर काय? असा आमचा सवाल आहे. विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला.
शेतकरी अडचणीत - शेतकरी आत्महत्या सुरु आहेत, एकट्या मराठवाड्यात इतक्यात 75 आत्महत्या झाल्या आहेत. दिवाळी किट टेंडर नियम डावलून काढले, लूट केली तरी सुद्धा सरकार चे दुर्लक्ष आहे. स्वतःच फोटो लावण्यासाठी औरंगाबादच्या पालकमंत्र्यांनी किट वाटू दिले नाही. राज्यात हे सरकार आहे की नाही अशी परिस्थिती आहे. कृषी मंत्री थोडे बहुत फिरले मात्र बाकी मंत्री कुठंच दिसत नाहीत. इन्शुरन्स कंपनी टोल फ्री नंबर बंद आहे. कृषी पीक विमा कंपनी सुद्धा फक्त स्वतःच खिशा भरताय. सरकार मात्र बदल्या करण्यात गुंग आहे. प्रशिक्षीत माणसे यांच्या कडे नाही असा आरोप विधानपरिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला.
उध्दव ठाकरे यांची शक्ती दिसेल - राणे म्हणाले 4 आमदार आमच्या संपर्कात आहे, यावर अंबादास म्हणाले ते रात्री बोलले की दिवसा, तिघे एकत्र आले दीपोत्सवात, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात एक शक्ती दिसणार आहे. या ताकतील घाबरून तिघे एकत्र आले असतील, आम्ही पुरून आणू त्यांची झोप झाली नसेल. मुख्यमंत्री म्हणाले, राज ठाकरे यांच्याकडे 10 वर्ष येऊ शकलो नाही इकडे यावर अंबादास दानवे यांनी उत्तर ते आधी पासून ते पक्ष विरोधी लोकांच्या संपर्कात होते असे दिसतंय अस ते म्हणाले.
उद्योग मंत्र्यांनी उद्योग आणावे - रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणी अस वागणं बरं नाही. आरोपींची चौकशी आरोप झाल्यावर व्हायला हवी, असे पक्षपातीपणे वागू नये. उदय सामंत यांनी उद्योग बाबत बोलण्यापेक्षा इतर मुद्द्यांवर उत्तर द्यावे, एमआयडीसी च्या अनेक जागा यांनी वाटलेल्या रद्द केला आहेत. अनेक प्रकल्प गेले त्यामुळं आरोप करण्यापेक्षा नवा प्रकल्प आणावा. अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.