ETV Bharat / state

कोरडे दाम्पत्यांनी वऱ्हाड्यांना घडवली 'लग्नजत्रा', लावणी, भारूड, पोतराजासह सामाजिक संदेश देणारे अनेक उपक्रम

लग्न समारंभात येणाऱ्या पाहुण्यांनी भेट वस्तू देऊ नये. त्याबदल्यात जनावरांच्या चाऱ्यासाठी पैसे द्यावेत, असे आवाहनही कोरडे दाम्पत्याने केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. लग्नसोहळ्यात जमा झालेले जवळपास ७० हजार रुपये शेतकऱ्यांना चारा खरेदीसाठी देण्यात येणार आहेत.

औरंगाबादेतील लग्नजत्रा
author img

By

Published : May 3, 2019, 7:59 PM IST

Updated : May 3, 2019, 9:16 PM IST

औरंगाबाद - लग्न सोहळा सामाजिक संदेश देणारा असावा, या संकल्पनेतून जिल्ह्यातील कोरडे कुटुंबीयाने चक्क लग्न जत्राच भरवली. यामध्ये महाराष्ट्राच्या परंपरेचा प्रसार आणि प्रचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

सामाजिक संदेश देणारी 'लग्नजत्रा'

औरंगाबादच्या सिडको येथील रहिवासी विलास कोरडे आणि अलका कोरडे यांच्या मुलीचा विवाह सोहळ्यानिमित्त ही जत्रा भरवण्यात आली होती. खिर्डी गावात ४ एकर शेतात ही लग्नजत्रा आयोजीत करण्यात आली. लग्न समारंभासाठी आलेल्या पाहुण्यांना महाराष्ट्राच्या कलांचे दर्शन व्हावे, कलेचे महत्त्व कळावे यासाठी हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. या जत्रेत शेतकऱ्यांनी शेतीवरच अवलंबून न राहता जोड धंदा करावा. तसेच महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचा संदेश देण्यात आला. महाराष्ट्राच्या लोककलेचे दर्शन घडवण्यात आले. पोतराज, लावणी, भारूड सारख्या कलांचे दर्शन या जत्रेच्या माध्यमातून झाले. एवढेच नाही, तर लहान मुलांच्या मनोरंजनासाठी खेळणी, उंट, जोकरदेखील होते.

लग्नजत्रेच्या माध्यमातून कोरडे यांच्या शेतात वृद्धाश्रमदेखील सुरू करण्यात आले. निराधार वृद्धांना विनःशुल्क येथे राहता येणार आहे. लग्न समारंभात येणाऱ्या पाहुण्यांनी भेट वस्तू देऊ नये. त्याबदल्यात जनावरांच्या चाऱ्यासाठी पैसे द्यावेत, असे आवाहनही कोरडे दाम्पत्याने केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. लग्नसोहळ्यात जमा झालेले जवळपास ७० हजार रुपये शेतकऱ्यांना चारा खरेदीसाठी देण्यात येणार आहेत. नातेवाईकांना रक्तदान करण्याचेही आवाहन करण्यात आले होते. यामधून जवळपास ५० बाटल्या रक्त जमा झाले. सामाजिक भान जपणाऱ्या आगळ्यावेगळ्या लग्नसोहळ्याच्या नियोजनाने वर आणि वधूने आनंद व्यक्त केला.

Intro:लग्न समारंभ म्हणल कि कौटुंबिक उत्सव आलाच, मात्र लग्न सोहळा सामाजिक संदेश देणारा असावा या कल्पनेतून औरंगाबादच्या कोरडे कुटुंबीयांनी चक्क लग्न जत्राच भरवली. या जत्रेत महाराष्ट्राच्या परंपरेचा प्रसार आणि प्रचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. Body:औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबादच्या खिर्डी गावात हि जत्रा भरवण्यात आली, या जत्रेच्या माध्यमातून शेतकर्यांनी जोड धंदा करावा, महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचा संदेश देण्यात आला. Conclusion:Vo1 - औरंगाबादच्या खिर्डी गावात जत्रा भरवण्यात आली. या जत्रेत महाराष्ट्राच्या लोककलेचे दर्शन घडवण्यात आले. पोतराज, लावणी, भारुड सारख्या कलांच दर्शन या जत्रेत झाल. लहान मुलांची खेळणी, उंट, जोकर देखील होते, मात्र हि जत्रा जरी असली तरी हि नुसती जत्रा नसून हि लग्न जत्रा होती. औरंगाबादच्या सिडको येथील रहिवासी विलास कोरडे आणि अलका कोरडे यांच्या मुलीचा विवाह सोहळ्यानिमित्त ही जत्रा भरवण्यात आली होती. खिर्डी गावात चार एकर शेतात ही लग्नजत्रा आयोजित करण्यात आली. लग्न समारंभासाठी आलेल्या पाहुण्यांना महाराष्ट्राच्या कलांचा दर्शन व्हावं, त्यांचं महत्व कळावं, या करिता अनोखा उपक्रम राबविण्यात आला. या जत्रेत शेतकऱ्यांनी शेतीवरच अवलंबून न राहता जोड धंदा करावा असा सामाजिक संदेश देण्यात आला. लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांनी परत जाताना सामाजिक संदेश घेऊन परत जावं यासाठी ही जत्रा आयोजित केल्याचं कोरडे दाम्पत्यांचं म्हणणं आहे.

Byte - विलास कोरडे - जत्रेचे आयोजक

Byte - अलका कोरडे - जत्रेच्या आयोजिका

Vo2 - या लग्नजत्रेच्या माध्यमातून कोरडे यांच्या शेतात वृद्धाश्रम देखील सुरू करण्यात आले. नुराधार वृद्धांना विनाशुल्क येथे निवास करता येणार आहे. लग्न समारंभात येणाऱ्या पाहुण्यांनी भेट वस्तू देऊ नये, त्याबदल्यात जनावरांच्या चाऱ्यासाठी पैसे द्यावेत अस आवाहन कोरडे दाम्पत्यानी केलं होतं. या आव्हानाला चांगला प्रतिसाद मिळाला. लग्नसोहळ्यात जमाझलेले जवळपास 70 हजार शेतकऱ्यांना चारा खरेदीसाठी देण्यात येणार आहेत. नातेवाईकांना रक्तदान करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं, जवळपास 50 बाटल्या रक्त देखील देण्यात आलं. सामाजिक भान जपणाऱ्या आगळ्यावेगळ्या लग्नसोहळ्याच्या नियोजनाने वर आणि वधूने आनंद व्यक्त केला.

Byte - पल्लवी कोरडे - वधू
Byte - मंदार कुलकर्णी - वर

Vo3 - विवाह सोहळ्यामध्ये नातेवाईक येतात लग्न लागली की जेवण करून निघून जातात, मात्र आलेल्या नातेवाईक आणि मित्रपरिवारांना या सोहळ्याच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्यात आला. काही क्षण इतरांना आनंद देऊन आपल्या मुलीच्या आयुष्याची नवीन सुरुवात चांगली करण्याचा हा वेगळा प्रयत्न कोरडे दाम्पत्यांनी केला.
(Make it special dron shots in feed)
Last Updated : May 3, 2019, 9:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.