ETV Bharat / state

"एनआरसी सीएए विरोधात वंचित बहुजन आघाडी ठामपणे उभा"

author img

By

Published : Feb 25, 2020, 8:45 PM IST

वंबआच्या महिला आघाडीच्यावतीने औरंगाबादेत मेळावा घेण्यात आला. यावेळी महिलांवरील होणाऱ्या अत्याचार विरोधात लढाई उभारण्यासाठी रुपरेषा ठरवण्याबाबत विचार मंथन करण्यात आले. वंचितच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर वंचितच्या नेत्या अंजली आंबेडकर उपस्थित होत्या.

Anjali ambedkar
अंजली आंबेडकर

औरंगाबाद - नागरिकत्व नोंदणी रजिस्टर (एनआरसी), नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) व एनपीआर विरोधात वंचित बहुजन आघाडी हा एकटा पक्ष ठामपणे रस्त्यावर उतरुन विरोध करत असून, इतर पक्षांची भूमिका ही गोंधळ निर्माण करणारी आहे. तसेच भाजप फक्त मुस्लिमांना टार्गेट करुन असे कायदे करत असल्याचे अंजली आंबेडकर यांनी सांगितले आहे. वंचित बहुजन महिला आघाडीच्यावतीने औरंगाबाद येथे पत्रकार परिषद यावेळी त्या बोलत होत्या.

"एनआरसी सीएए विरोधात वंचित बहुजन आघाडी ठामपणे उभा"

हेही वाचा - इंदोरीकर महाराजांना मोठा दिलासा; तुर्तास तरी पीसीपीएनडीटी समितीचा कारवाईसाठी नकार

वंबआच्या महिला आघाडीच्यावतीने औरंगाबादेत मेळावा घेण्यात आला. यावेळी महिलांवरील होणाऱ्या अत्याचार विरोधात लढाई उभारण्यासाठी रुपरेषा ठरवण्याबाबत विचार मंथन करण्यात आले. यावेळी वंचितच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या, राज्यात स्थापन झालेले सरकार त्यांची गरज असल्याने तयार झाले आहे. मात्र, त्यांच्यात असलेले मतभेद दिसून येत असून, ताळमेळ देखील नाही त्यामुळे हे सरकार किती दिवस टिकेल याबाबत मला शंका वाटत आहे. तसेच देशातील नागरिकांना नागरिकत्वाचा पुरावा मागून भाजप सरकार हिंदू मुस्लिम अशी फळी निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप वंचितच्या नेत्या अंजली आंबेडकर यांनी केली.

खैरलांजी प्रकरणात राष्ट्रवादीकडे गृह खाते होते त्यावेळी त्यांनी योग्य न्याय दिला असे वाटत नाही, आणि आज त्यांच्याकडेच गृहखाते असले तरी त्याच्याकडून काही अपेक्षा करण्यासारखी परिस्थिती दिसत नसल्याचे ठाकूर म्हणाल्या.

"औरंगाबाद महानगर पालिका निवडणुकीत वंचित सर्व मतदार संघात स्वतंत्र उमेदवार उभे करण्याची तयारी आहे. त्यासाठी आम्ही एक समिती स्थापन केली होती त्यांनी निरीक्षक म्हणून काम केले. एमआयएमचा अद्याप प्रस्ताव देखील नाही. औरंगाबादेत आमची मोठी ताकद आहे. त्यामुळे आम्हाला यश मिळेल. सरकारमधील तीनही पक्षांचा एकमेकांसोबत समन्वय नाही. त्यांची मत वेगवेगळी असल्याच दिसून येत असल्याची टीका ठाकूर यांनी केली.

औरंगाबाद महानगर पालिका निवडणुकीत उमेदवारी देत असताना पक्षाशी निष्ठा असणाऱ्या लोकांना उमेदवारी देऊ. समविचारी पक्षांना सोबत घेऊन सोबत जायची भूमिका भारिप बहुजन पक्षाची होती आणि आजही वंचितची ती भूमिका आहे. सत्तेसाठी तीनही पक्ष एकत्र आले आहेत. एनआरसी आणि सीएए विरोधात सर्व समविचारी लोकांनी एकत्र आले पाहिजे. त्यांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. एकत्र आले तर मोठा लढा उभारला जाऊ शकतो. वंचित एकटीच त्याच्या विरोधात रस्त्यावर उतरली आहे. असा टोला अंजली आंबेडकर यांनी एमआयएमला लगावला. सर्व एकत्र आले तर मोठी लढाई उभी राहू शकते असे मत अंजली आंबेडकर यांनी व्यक्त केले.

हेही वाचा - शिवसेना-भाजपने एकत्र येऊन पुन्हा सरकार बनवावे - रामदास आठवले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.