ETV Bharat / state

वैजापूरच्या पुत्राचे लसीकरण प्रबोधन गीत देशभरात प्रसिध्द

author img

By

Published : May 21, 2021, 10:32 AM IST

कोरोना नावाचे संकट हद्दपार करण्यासाठी आपली आरोग्य यंत्रणा 24 तास कष्ट करत आहे. त्यातच लोककलावंत लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी लोकगीताच्या माध्यमातून प्रबोधन करत आहे. वैजापूरच्या योगेश चिकटगावकर यांनी लसीकरणावर तयार केलेले गीत संपूर्ण देशभरात प्रसिद्ध झाले आहे.

योगेश चिकटगावकर
योगेश चिकटगावकर

वैजापूर - ज्या वेळी समाजावर संकट येते, त्या त्यावेळी लोककलावंत प्रबोधनाच्या माध्यमातून संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगतात. आज कोरोना नावाचे संकट देशासमोर आहे आणि यातून बाहेर पडण्याचा मार्ग लसीकरण हाच आहे. त्यामुळेच लोककलावंतांनी लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी लसीकरणाबाबतचे गैरसमज लोकगीताच्या माध्यमातून दूर केले आहेत.

घ्या करून लसीकरण, लावा कोरोनाला पळवून..

लोकगीताच्या माध्यमातून लस घेण्याचे आवाहन

'घ्या करून लसीकरण, लावा कोरोनाला पळवून..' हे गीत म्हणणारे आहेत औरंगाबादच्या वैजापूर येथील लोककलावंत योगेश चिकटगावकर. सध्या राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. लोकांना रुग्णालयात बेडही मिळत नाहीत. सर्वसामान्य लोकांचे हाल सुरू आहेत. त्यामुळे यातून बाहेर पडण्यासाठी लसीकरण करुन घेणे गरजेचे आहे. त्यामुळे लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी लोककलावंत पुढे सरसावले आहेत. ते लोकगीताच्या माध्यमातून लस घेण्याचे आवाहन करत आहेत.

वैजापूरच्या पुत्राचे लसीकरण प्रबोधन गीत देशभरात प्रसिध्द

गीताच्या निर्मितीची कहाणीही भन्नाट

या गीताप्रमाणे त्याच्या निर्मितीची कहाणीही भन्नाट आहे. कोरोनामुळे आप-आपल्या गावी असलेले कलावंत एकत्र येणे शक्य नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या गावी राहून मोबाईलवर गाण्याचे चित्रीकरन केले आणि त्यानंतर त्याचे एडिटिंग झाले.

हेही वाचा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर; थोड्याच वेळात रत्नागिरीत होणार दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.