छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : जगप्रसिद्ध अजिंठा लेणीतील शिल्पांसाठी एलईडी लाईटचा वापर करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. शेकडो वर्षांपासून देशाला ऐतिहासिक महत्त्व देणाऱ्या अजिंठा लेणी परिसरात वेगवेगळे बदल नेहमीच केले जातात. कधी तिथल्या वास्तू चांगल्या असाव्या म्हणून तर, कधी पर्यटकांना सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी हे बदल केले जातात. याआधी पिवळा प्रकाश देणारे साधे बल्ब लाऊन तेथील शिल्प पर्यटकांना दाखवले जात होते. त्या नंतर 2002 मधे वेगळ्या प्रकारचे हलका प्रकाश देणारे बल्ब वापरून उजेड करण्यात आला.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर : त्यातून निर्माण उष्णता कमी करण्यासाठी आधुनिक पद्धतीचा वापर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सध्या आताच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेले अद्यावत असे एल ई डी लाईट लावण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. 295 लाईट बदलण्याचे काम सुरू झाले, असून जवळपास 135 लाईट बदलण्यात आले असून उर्वरित काम लवकर पूर्ण होईल असा विश्वास पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
कृत्रिम लाईट मुळे लेणी मधील रंगकाम धोक्यात : जगप्रसिद्ध अजिंठा लेणी त्याचे असले शिल्प आणि रंगकाम यासाठी जगात प्रसिद्ध आहेत. मात्र, निसर्गात होणारे सतत बदल, माणसाचा वाढलेला वावर यामुळे लेणीच अस्तित्व धोक्यात सापडल आहे. तेथील असलेले रंगकाम काळाच्या ओघात खराब होत जात आहे. इतकच नाही तर तिथे माणसांचा वावर वाढल्याने निर्माण होणाऱ्या कार्बन डाय ऑक्साइड यामुळे देखील लेणीवर परिणाम होताना दिसून येतोय.
लाईटमुळे वीज बचत : गेल्या काही वर्षात असलेल्या चित्रांचे रंग हळूहळू कमी होत गेले. त्यावर अनेक वेळा कामही करण्यात आले. मात्र लावण्यात येणाऱ्या लाईट मुळे तिथे असलेल्या नैसर्गिक रंगांवर होणारा परिणाम पाहता तिथे लाईट बदलण्यात येत आहेत. यामुळे तिथे असलेले चित्र शिल्प यांच्यावरील रंग देखील चांगले राहतील तर, दुसरीकडे प्रकाश चांगला पडेल. आधुनिक पद्धतीची लाईट असल्यामुळे वीज बचत देखील होईल. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असून त्याचं काम लवकरच पूर्ण होईल अशी माहिती देखील पुरातत्त्व विभागाकडून देण्यात आली.