ETV Bharat / state

Smriti Irani In Chhatrapati Sambhajinagar: नळावर भांडले म्हणून लोकसभेत भांडू शकते - स्मृती इराणी - केंद्रीय मंत्री स्मृती इराणी औरंगाबादमध्ये

नळावर भांडण केले म्हणून संसदेत भांडू शकते. तिथले भांडण वेगळेच राहते, असे मत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी व्यक्त केले. सेल्फी विथ लाभार्थी योजनेला सुरुवात त्यांच्या उपस्थितीत महिलांसोबत सेल्फी काढून सुरू शुभारंभ केला. गांधी कुटुंबीयांना त्यांच्या गडात हरवले म्हणून त्यांनी मोदी यांच्या मृत वडिलांवर आणि शंभर वर्षांच्या आईवर टीका केली. मात्र जनता म्हणते, 'मोदी तेरा कमल खीलेगा', अशी टीका स्मृती इराणी यांनी केली.

Smruti Irani In Chhatrapati Sambhajinagar
स्मृती इराणी
author img

By

Published : Feb 27, 2023, 8:55 PM IST

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी जनतेशी संवाद साधताना

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): छत्रपती संभाजीनगर या नव्या नावाला मान्यता मिळाल्यावर पहिल्यांदाच उत्तर भारतातील केंद्रीय मंत्र्याचे नगरीत आगमन झाले. कार्यक्रम सेल्फीचा नाही, कोणाला बाजूला उभे करून फोटो काढायचा म्हणजे त्याच्या सोबत नाते जोडतो जाते. आपलेपणाची भावना महिलांमध्ये जगवली ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपमुळे शक्य झाले. अनेकांना अन्न दिले, घर दिले, शौचालये दिली. याचे नुसते आकडे नाहीत मात्र त्यांच्या भावना आहे. त्यामुळे आलेल्या महिला मोदींना आशीर्वाद देत आहेत. महाराष्ट्रात राजनीती नाही तर राष्ट्रनिती होते. महिलांना लाभार्थी या नावात सीमित करत नाही. मात्र एक आई, मुलगी खऱ्या अर्थाने आशीर्वाद देते. देशात शौचालय हवे यासाठी महिलांनी कधी पुढाकार घेतला नाही. मात्र नरेंद्र मोदी यांनी निवडणूक जिंकल्यावर स्वतः त्याची घोषणा केली. अकरा करोड लोकांना जलजीवन अंतर्गत नळाला पाणी मिळाले. मोदींनी महाराष्ट्राला मोठी मदत केली. अंगणवाडीमधे मोबाईल आले. महिलांना मदत केली. त्यामुळे इथून जास्त सेल्फी मिळतील असा विश्वास आहे असे स्मृती इराणी यांनी सांगितलं.

केंद्राने कायदा केला: सेल्फी विथ लाभार्थी मोहीम अंतर्गत केंद्र आणि राज्य सरकारने राबवलेल्या विविध योजनांची माहिती भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी दिली. उर्फी जावेदमुळे चर्चेत आलेल्या चित्रा वाघ यांनी देशात महिलांवर अत्याचार झाला तर आता सहन केला जाणार नाही. कायदा चांगला तयार केला. 12 वर्षाखालील मुलींवर अत्याचार करणाऱ्यांना फाशी देण्याचा निर्णय, 16 वर्षाखालील वीस वर्ष सक्त मजुरी, अशा शिक्षणाची तरतूद केली आहे. राज्याचे सरकार मागे नाही. महिलांची तक्रार न घेणाऱ्या दोन डझन पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली, असे मत चित्रा वाघ यांनी व्यक्त केले.

खालच्या लोकांपर्यंत पोहचला फायदा: देशातील वेगवेगळ्या योजनेमुळे गरीबांना आणि इतरांना कसा लाभ होईल, फायदा होईल यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून काम केले जात आहे. बँकेत खाते उघडण्यासाठी असलेल्या अडचणी दूर केल्या. त्यात महिलांची संख्या अधिक आहे. स्टँड अप योजना सुरू केली. त्यातून महिलांसाठी रोजगार सुरू करणे सोपे झाले. प्रत्येक बँकेत महिलांना उद्योग उभारणीसाठी कर्ज देण्याबाबत सूचना देण्यात आल्या. लसीकरण झाल्यामुळे कोविड नियंत्रणात आला. देवेंद्र फडणवीस यांनी देखील चांगल्या योजना राबवल्या. भारत विश्व गुरू होईल, आपले मार्गदर्शन जगासाठी महत्त्वाचे असेल असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी सांगितले.

मनसे, ठाकरे गटाचा जल्लोष: शहराच्या नामांतराची घोषणा शुक्रवारी रात्री केंद्राकडून झाल्यानंतर, शनिवारी सकाळपासूनच टीव्ही सेंटर चौकातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ जल्लोष करण्यात आला. ठाकरे गटाकडून शहर प्रमुख असलेले बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संभाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून, एकमेकांना पेढे भरवत फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. तर त्यानंतर त्याच ठिकाणी मनसेने देखील जल्लोष केला. मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते फेटे घालून संभाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करत पुतळास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी ढोल ताशाच्या गजरात फटाके फोडत आणि मोतीचूरचे लाडू एकमेकांना भरवत आनंद साजरा केला. 35 वर्षांनी जनतेच्या मनात इच्छा पूर्ण झाली असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

शिंदे गटाने बदलली नावे: औरंगाबाद लिहिलेल्या जागी छत्रपती संभाजी नगर करण्याची मोहीम शिंदे गटाच्या शिवसेनेकडून सुरू करण्यात आली. शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यावतीने शिवाजीनगर परिसरातील ज्या ज्या दुकान वर औरंगाबाद नाव लिहिले आहे त्या दुकान वरील पाट्या काढून छत्रपती संभाजीनगर असे पोस्टर चिटकवण्यास सुरुवात करण्यात आली. औरंगजेबाची आठवण असलेले औरंगाबाद नाव काढून आता छत्रपती संभाजीनगर नाव लावत असून या निर्णयाला विरोध करणाऱ्या खासदार इम्तियाज जलील यांना संभाजी महाराजांवरील पुस्तक भेट देणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी राजेंद्र जंजाळ यांनी दिली.

हेही वाचा: Manish Sisodia to CBI Remand : मनीष सिसोदियांना पाच दिवसांची सीबीआय कोठडी; दिल्लीतील राजकीय वातावरण तापले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.