ETV Bharat / state

औरंगाबाद : तुरुंगातून बाहेर येताच त्याने पुन्हा केली 9 दुचाकींची चोरी - औरंगाबाद लेटेस्ट न्यूज

कारागृहातून सुटल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत 9 दुचाकी आणि एका टेम्पोची चोरी करणाऱ्या अट्टल चोराला सिडको पोलिसांनी अटक केली आहे. या चोरट्याकडून चोरी करण्यात आलेली वाहने जप्त करण्यात आली आहेत. शेख अनिस शेख यूसूफ (३०, रा. बायजीपुरा, औरंगाबाद) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकी
पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकी
author img

By

Published : Mar 29, 2021, 5:01 PM IST

औरंगाबाद - कारागृहातून सुटल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत 9 दुचाकी आणि एका टेम्पोची चोरी करणाऱ्या अट्टल चोराला सिडको पोलिसांनी अटक केली आहे. या चोरट्याकडून चोरी करण्यात आलेली वाहने जप्त करण्यात आली आहेत. शेख अनिस शेख यूसूफ (३०, रा. बायजीपुरा, औरंगाबाद) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

आरोपीकडून वाहने जप्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुरुमखेडा येथील रहिवासी रऊफ शब्बीर शेख हे २३ मार्च रोजी पहाटे ४ वाजता त्याच्या मालकीचा टेम्पो घेऊन नवा मोंढा जाधववाडी येथे आले होते. त्यांनी याठिकाणी टेम्पो पार्क केला, व ते कामासाठी बाहेर गेले. यावेळी त्यांच्या वाहनाची चोरी झाली. त्यांनी याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दरम्यान तक्रार दाखल होताच पोलिसांनी वाहनाचा तपास सुरू केला. तेव्हा पोलीस रेकाॅर्डवरील संशयित चोरटा अनिस याने हा टेम्पो चोरल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार त्याच्यावर पाळत ठेवून त्याला पकडण्यात आले. त्याच्याकडून चोरीचे वाहन जप्त करण्यात आले असून, त्याने चौकशी दरम्यान अनेक दुचाकींची चोरी केल्याचे कबूल केले आहे. पोलिसांनी या सर्व दुचाकी जप्त केल्या आहेत.

दुचाकी चोराला अटक

वर्षभरापूर्वी 12 दुचाकींची चोरी

आरोपी अनिसला गेल्यावर्षी सिडको पोलिसांनी दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्यावेळी त्याच्याकडून तब्बल १२ दुचाकी जप्त केल्या होत्या. या वाहन चोरीच्या गुन्ह्यात तो सुमारे आठ महिने जेलमध्ये होता. कोविड संसर्गामुळे त्याला जामीन मिळाला आणि दोन महिन्यांपूर्वी तो जेलमधून बाहेर आला. यानंतर त्याने पुन्हा दुचाकी चोरण्यास सुरुवात केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.