ETV Bharat / state

औरंगाबादेत आणखी दोन महिला कोरोना पॉझिटीव्ह, बाधितांचा आकडा चाळीसवर

भावसिंगपुरा येथील एका महिलेचा मृत्यू झाल्यावर तिचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. महिलेचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचा समज लोकांना झाला. त्यामुळे, जवळपास 100 लोक महिलेच्या अंत्यविधीत सहभागी झाले. मात्र नंतर अहवाल पॉझिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

औरंगाबादेत आणखी दोन महिला कोरोना पॉझिटीव्ह

author img

By

Published : Apr 23, 2020, 12:00 PM IST

औरंगाबाद - जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज आणखी दोन महिलांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे, औरंगाबादची रुग्णसंख्या 40 वर पोहोचली आहे. भावसिंगपुरा भीमनगर येथील 45 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. तर समतानगर येथील एका महिलेचा अहवालदेखील पॉझिटीव्ह आला आहे.

समतानगर येथे आढळून आलेल्या रुग्णांची संख्या सहावर गेल्याने हा परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरण्याची शक्यता आहे. भावसिंगपुरा येथील एका महिलेचा मृत्यू झाल्यावर तिचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. महिलेचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचा समज लोकांना झाला. त्यामुळे, जवळपास 100 लोक महिलेच्या अंत्यविधीत सहभागी झाले. मात्र नंतर अहवाल पॉझिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मृत महिलेच्या संपर्कातील महिलेला कोरोनाची बाधा असल्याने आरोग्य विभागासमोरील चिंता वाढली आहे. दोन रुग्ण वाढल्याने आता बाधित रुग्णांचा आकडा 40 वर पोहचला आहे. यामध्ये 15 रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार करण्यात आले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 20 जणांवर उपचार सुरू आहेत. तर, काही अहवाल अद्याप प्राप्त होणे बाकी आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.