ETV Bharat / state

Two laborers Died: चेंबरमधे गुदमरून दोन मजुरांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी, नातेवाईकांनी फोडला टाहो

शहरातील सलीम अली सरोवर येथील ड्रेनेज चेंबरमध्ये गुदमरून दोन मजुरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली आहे. अंकुश थोरात आणि रावसाहेब घोरपडे अशी मृतांची नावे आहेत. चेंबरमध्ये उतरलेल्या आणखी दोन मजुरांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

Two laborers Died
दोन मजुरांचा मृत्यू
author img

By

Published : May 8, 2023, 5:56 PM IST

छत्रपती संभाजीनगर: ड्रेनेज चेंबरमध्ये सफाई करणाऱ्या दोन कामगारांचा गुदमरून मृत्य झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना सलीम अली सरोवर उद्यान परिसरातील आहे. या घटनेत चार जण बुडाले होते, माहिती मिळताच त्यांना बाहेर काढण्यात आले. तर त्यांना घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यातील दोघांचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कुटुंबीयांना माहिती कळतच त्यांनी टाहो फोडला. याप्रकरणी सिटीचौक पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत अंकुश यांना तीन मुले आहेत, रावसाहेब याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. उपचार सुरू असलेल्या विष्णू याला चार मुले तर बाळू याला दोन मुले एक मुलगी असे कुटुंब असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.

दोघांचा मृत्यू: चेंबरचे काम करताना चार जण बुडल्याची धक्कादायक घटना मलजल केंद्र सलीम अली सरोवर परिसरात मोकळ्या जागेत घडली. यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. तर दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेत रस्त्यावरच टाहो फोडला. याप्रकरणी नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी, अंकुश बाबासाहेब थोरात (वय 32) राहणार, हिमायत बाग भीमराज नगर, रावसाहेब सदाशिव घोरपडे (वय 33) राहणार भीमराज नगर असे मृत कामगारांचे नाव आहे. तर विष्णू उगले राहणार हिमायतबाग आणि बाळू विश्राम खरात यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू असून दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती आहे.

मोल मजुरी मिळाल्याने घेतले काम: चारही जण हे मोल मजुरीचे काम करत होते. मलजल प्रक्रिया केंद्र या ठिकाणी चेंबरचे काम असल्याची माहिती त्यांना मिळाली. रोजगार मिळाल्यामुळे सर्वजण त्या ठिकाणी कामावर गेले. यातील एक जण चेंबरमध्ये बुडाल्यानंतर ही बाब इतर सहकाऱ्यांच्या लक्षात आली. त्याला वाचण्यासाठी दुसरा आत गेला पण, तोही बुडाला. तिसरा सहकारी आत गेल्यानंतर तोही त्यात गेला असे करत चारही जण चेंबरमध्ये अडकले. दरम्यान ही बाब मित्रांच्या लक्षात आले. त्यांना अग्निशमन दलाच्या मदतीने चौघांना बाहेर काढत, त्यांना तात्काळ घाटी रुग्णाला दाखल करण्यात आले. यापैकी दोघांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले तर दोघावर उपचार सुरू आहे. या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यामध्ये अकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक शिंगारे करीत आहे.

हेही वाचा:

Sambhaji Nagar News समृद्धी महामार्गामुळे शेतीचे नुकसान शेतकऱ्याने टोल नाक्यावर आडवा लावला ट्रॅक्टर

Chhatrapati Sambhajinagar धक्कादायक शाळा बंद मात्र अनुदान सुरू शिक्षण विभागाला भनकसुद्धा नाही

Chhatrapati Sambhaji Nagar Crime News महिलेवर अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.