ETV Bharat / state

Accident In Aurangabad: औरंगाबादेत साकेगाव - मनूर रस्त्यावर अपघात; चुलती-पुतणीचा जागीच मृत्यू

औरंगाबादमधील साकेगाव - मनुर रस्त्यावर झालेल्या भीषण ( Accident In Aurangabad ) अपघात दोन मजूर महिलांचा मृत्यू झाला ( Two Woman Killed In Accident ) . शेतात मोलमजूरी करुन उपजिविका भागवणा-या दोन शेतमजूर महिलांना भरधाव वेगाने टेम्पोने चिरडले यात त्या दोघी जागीच ठार झाल्या. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मृत दोघीही नात्याने चुलती पुतणी होत्या.

Accident In Aurangabad
अपघातात दोघींचा मृत्यू
author img

By

Published : Aug 6, 2022, 10:24 AM IST

वैजापूर (औरंगाबाद) - औरंगाबादमधील साकेगाव - मनुर रस्त्यावर भीषण अपघात घडला ( Accident In Aurangabad ) आहे. शेतात मोलमजूरी करुन उपजिविका भागवणा-या दोन शेतमजूर महिलांना भरधाव वेगाने टेम्पोने चिरडले यात त्या दोघी जागीच ठार झाल्या ( Two Womans Crushed By The Tempo ) . त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मृत दोघीही नात्याने चुलती पुतणी होत्या. ठगनबाई विश्वनाथ दवंगे (५६), मंगल आसाराम दवंगे (३८) अशी या दोघींची नावे आहेत ( Two Woman Killed In Accident ) .

वाहन चालकाने पळ काढला - रस्ते अपघातात सांयकाळी घराकडे परतताना काळाने त्यांच्यावर मुत्यूची झडप घातली. टेम्पो क्र.एमएच २१ डी ९११६ ने जोराची त्यांना धडक दिली या अपघातानंतर चालकाने वाहन जागेवर सोडून पळ काढला ( Tempo Driver Run Away ). ठगनबाई दवंगे यांच्या पतीचे निधन झालेले आहे. त्यांना दोन मुले असून दोन्ही अविवाहित आहेत. त्यामुळे त्यांचा संसार उघड्यावर पडला आहे. तर मंगलबाई दवंगे यांना पती नांदवत नसल्याने माहेर राहुन मोल मजुरी करुन त्यांचा उदरनिर्वाह करीत होत्या. अपघाताची माहिती मिळल्यावर शिऊर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप पाटील,उपनिरीक्षक अंकुश नागटिळक, जमादार गणेश गोरक्ष, पैठणकर आदींनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी मणुर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. या प्रकरणी वाहनचालका विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

हेही वाचा -Interview With Prithviraj Chavan: देशात मोदी सरकारची दडपशाही, पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप; पाहा खास मुलाखत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.