ETV Bharat / state

संभाजीनगर जिल्हा पुन्हा हादरला, अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या दोन घटना - सिल्लोडमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना

छत्रपती संभाजीनगरमध्ये बलात्काराच्या २ घटना घडल्या आहेत. एका अल्पवयीन मुलीवर तिच्या बापाने बलात्कार केला आहे. तर दुसऱ्या एका घटनेत बापाच्या मित्राने मुलीवर बलात्कार केला आहे. कालच सामूहिक बलात्काराची घटना समोर आल्यानंतर आज शहरात या घटना पुढे आल्या आहेत.

संभाजीनगर
संभाजीनगर
author img

By

Published : Jun 10, 2023, 8:47 PM IST

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) - सातारा परिसर येथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचाराची घटना ताजी असताना सिडको भागात सख्ख्या बापानेच आपल्या मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. विशेष म्हणजे नराधम पित्याला तीन मुली असून पत्नी पुन्हा नऊ महिन्याची गर्भवती आहे. तर तिच्यावर याआधीही शेजारच्या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची बाब उघड झाली आहे. तर सिल्लोड येथे वडिलांच्या मित्राने सात वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली.

वडिलांनीच केला अत्याचार - सिडकोत राहणाऱ्या एका नराधम पित्याने धाक दाखवून स्वतःच्या चौदा वर्षीय मुलीवर अत्याचार केला. या नराधम आरोपीला तीन मुली आहेत. पीडिता ही आरोपीची मोठी मुलगी असून ती नववीत शिकते.. तर दुसरी मुलगी बारा वर्षाची असून तिसरी नऊ वर्षाची आहे. तर पत्नी नऊ महिन्यांची गर्भवती आहे. नराधमपणाचा कळस अशा आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 12 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

याआधीही गुन्हा दाखल - आरोपीने 2015 मध्ये शेजारच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा देखील दाखल आहे. त्यावेळी अटक झाल्यानंतर न्यायालयात पीडित मुलीने साक्ष फिरवल्याने आरोपीला सोडण्यात आले. त्यामुळे त्यांचे मनोबल वाढले आणि त्याने स्वतःच्या मुलीवर अत्याचार केला. सातारा परिसरात चौदा वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना ताजी असताना सिडको भागातील या घटनेने शहरात संतापाची लाट पाहायला मिळत आहे. मुली सुरक्षित आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

सिल्लोडमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना - दुसऱ्या घटनेत सिल्लोडमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. वडिलांच्या मित्राने 50 रुपयांचे आमिष दाखवून 7 वर्षीय चिमुकलीवर स्वतःच्या घरात नेऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. पीडितेला त्रास सुरू झाल्याने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी शनिवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे. शेख मुनवर उर्फ मंनु अनीस शेख असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने कुणाला काही सांगितले तर जीवे मारून टाकण्याची धमकी तिला दिली. भीतीपोटी मुलीने घरात काही सांगितले नाही. मात्र, तिला त्रास होत असल्याने तिच्यावर अत्याचार झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर आईने विश्वासात घेऊन विचारले असता, वडिलांच्या मित्रानेच 50 रुपये देण्याचे आमिष देत घरी घेऊन जात अत्याचार केल्याचे चिमुकलीने सांगितले. दरम्यान, पीडीतेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून सिल्लोड शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपी शेख मुनवर उर्फ मंनु अनीस शेख (रा. सिल्लोड ) यास लागलीच ताब्यात घेतले. पुढील तपास पोलीस निरीक्षक शेषराव उदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.

हेही वाचा..

  1. Gang Rape Of Minor Girl: छत्रपती संभाजीनगरमध्ये चौदा वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार; चार अटकेत दोघे फरार, आरोपींमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश
  2. Girl Rape Case Thane : शेजारच्या नराधमाचा घरात घुसून बळजबरीने तरुणीवर बलात्कार
  3. Tourist Girl Raped In Shimla : शिमला फिरायला गेलेल्या मुंबईतील अल्पवयीन तरुणीवर टॅक्सी चालकाचा बलात्कार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.