ETV Bharat / state

अंगावर भिंत कोसळून 2 जणांचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील चिकलठाण येथील घटना - two died due to wall collapsed

चिकलठाण येथे सुभाष बोरसे यांच्या घराचे बांधकाम सुरु आहे. तिसऱ्या मजल्यावरील जिन्याच्या भिंतीचे बांधकाम नुकतेच झालेले आहे. मंगळवारी दुपारी सोसाट्याचा वारा सुटला होता. यानंतर अचानक भिंत कोसळली.

two died due to wall collapsed in chikhalthan kannad
अंगावर भिंत कोसळून 2 जणांचा मृत्यू
author img

By

Published : Jul 28, 2021, 10:38 AM IST

कन्नड (औरंगाबाद) - अंगावर भिंत पडल्याने दोन जणांचा मृत्यू झाल्याची मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ही घटना तालुक्यातील चिकलठाण येथे घडली. जब्बारशहा मन्नुशहा (५६) व संजय शेकु सोनवणे
(४५) अशी मृतांची नवे आहेत.

उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू -

चिकलठाण येथे सुभाष बोरसे यांच्या घराचे बांधकाम सुरु आहे. तिसऱ्या मजल्यावरील जिन्याच्या भिंतीचे बांधकाम नुकतेच झालेले आहे. मंगळवारी दुपारी सोसाट्याचा वारा सुटला होता. यानंतर अचानक भिंत कोसळली. भिंतीलगत लाकडी बाकावर बसलेले जब्बारशहा मन्नुशहा (56) व संजय शेकु सोनवणे (४५, दोघेही रा. चिकलठाण) यांच्या अंगावर भिंत कोसळल्याने ते गंभीर जखमी झाले. जखमींना कन्नडच्या खासगी
रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच दोघांचीही प्राणज्योत मालवली.

घटनास्थळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालक कोळी, पोलीस उपनिरीक्षक बजरंग कुटुंबरे, सतीश खोसरे आदींनी भेट दिली. दोघांची उत्तरीय तपासणी चिकलठाण प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आली. पुढील तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत.

हेही वाचा - मुंबईत 4 मजली इमारत समोरच्या 3 घरांवर कोसळली

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.