ETV Bharat / state

Aurangabad Crime : तलवार बाळगणाऱ्या दोघांना अटक; तिघांविरोधात गुन्हा दाखल - Gangapur Crime

गंगापूर शहरात राहणाऱ्या दोघांना घरात तलवार बाळगल्याप्रकरणी गुरुवारी सायंकाळी गंगापूर पोलिसांनी दोन ठिकाणाहून दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी दोन तलवारी जप्त करत दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी तलवार विकणाऱ्यासह तिघां विरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Aurangabad Crime
आरोपींना अटक
author img

By

Published : Feb 3, 2023, 5:24 PM IST

गंगापूर (औरंगाबाद): संतोष माणिकराव खेडकर आणि सुभाष भाऊराव साळुंखे अशी आरोपींची नावे आहेत. यातील तलवार विक्री करणारा एक फरार असलेल्या आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. गंगापूर शहरातील जयसिंग नगरातील एकाकडे धारदार तलवार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गंगापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक साईनाथ गीते यांनी पथकासह जयसिंग नगर येथे राहणाऱ्या संतोष माणिकराव खेडकर यांच्या घरी गुरुवारी सायंकाळी धाड टाकत घरात शोध घेतला. यावेळी घरात पोलिसांना धारदार तलवार मिळून आली. पोलिसांनी तलवार जप्त करून आरोपीला अटक केली. यावेळी गंगापूर शहरात आणखी एकाकडे तलवार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. शहरातील जामगाव रोडवर भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या सुभाष भाऊराव साळुंखे यांच्या घरी छापा टाकला असता तिथून पोलिसांनी एक तलवार जप्त केली. याप्रकरणी आरोपीस अटक करून ताब्यात घेण्यात आले आहे.

तिघांच्या आवळल्या मुसक्या : आरोपीशी चौकशी केली असता ही तलवार त्यांनी सोनू धनसिंग राजपूत (राहणार - जयसिंगनगर गंगापूर) यांच्याकडून विकत घेतल्याचे सांगितले. यावरून पोलिसांनी तीन आरोपी संतोष माणिकराव खेडकर, सुभाष भाऊराव साळुंखे आणि सोनू धनसिंग राजपूत यांच्या विरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

यांनी केली कारवाई : ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश बेले यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक साईनाथ गीते, पोलीस कॉन्स्टेबल कैलास निंभोरकर, भरत घुगे, गुंजाळ यांच्या पथकाने केली आहे.यातील एक आरोपीचा शोध घेत असून अधिक तपास गंगापूर पोलीस करत आहेत.

वाहनचोरांमुळे डोकेदुखी वाढली : औरंगाबाद शहरात 2022 मध्ये सर्व प्रकारची 918 वाहने चोरीला गेली. यातील 854 या दुचाकींचा समावेश आहे. चोरी झाल्यावर वाहनाचा शोध घेणे शक्य होत नसल्याचे देखील समोर आले आहे. चोरलेली दुचाकी ग्रामीण भागात विकली जाते किंवा तोडफोड करून सुटे भाग करून विकण्यात येतात. त्यामुळे 918 वाहन चोरींपैकी केवळ 293 वाहने पुन्हा जप्त करण्यात पोलिसांना यश आले. विशेष म्हणजे रुग्णालय, मॉल, शैक्षणिक संस्था, रस्त्यावर लावलेली वाहने चोरीला जात आहेत. यामुळे शहरातील ठिकाणे दुचाकी चोरींचे हॉटस्पॉट बनले आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

रविवार वाहन चोरांसाठी शुभवार : वाहन चोरीचे प्रमाण वाढत असताना, चोरांसाठी रविवारी धंद्याचा म्हणजेच चोरीसाठी शुभ असलेला दिवस असल्याचे दिसून आले आहे. मागील वर्षभरात रविवारच्या दिवशी 135 दुचाकी चोरीला गेल्या आहे. सोमवार 132, मंगळवार 113, बुधवार 116, गुरुवार 119, शुक्रवारी 123 आणि शनिवारी 116 दुचाकी चोरीला गेल्या आहेत. रात्रीच्या वेळी सर्वाधिक दुचाकींची चोरी झाली आहे. मागील वर्षभरात सकाळी सहा ते सायंकाळी सहा या वेळेत 389 दुचाकींची चोरी झाली, तर सायंकाळी सहा ते सकाळी सहा या वेळेत तब्बल 465 दुचाकी चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. शहरातील एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतून वर्षभरात सर्वाधिक 225 दुचाकींची चोरी झाली आहे. त्यानंतर सिडको एमआयडीसी, सिडको, पुंडलिक नगर, जवाहर नगर या पोलीस ठाण्यांचा क्रमांक लागतो.

हेही वाचा : Group Dharavi Redevelopment Project : अदानींना दिलेले कंत्राट रद्द करा; धारावी पुनर्विकास समितीची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.