औरंगाबाद : घरगुती गॅस रिफिलिंगद्वारे रिक्षात भरणाऱ्या त्रिकुटाला पोलिसांनी अटक केली. छावणी भागात ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून १ लाख २५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
छावणी आठवडी बाजार परिसरातील तबेल्याच्या बाजूला अवैधरीत्या गॅस रिफिलिंग सेंटर सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यावरून सहाय्यक आयुक्त रवींद्र साळोखे, पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक मनोज शिंदे, पोलीस अंमलदार संतोष सोनवणे, चंद्रकांत गवळी, भगवान शिलोटे, आनंद वाहूळ, रितेश जाधव, विशाल पाटील, पुरवठा निरीक्षक बबन आवले यांच्या पथकाने गॅस रिफिलिंग सेंटरवर छापा मारला.
यांना केली अटक -
शेख नूर शेख आयुब (वय ३५, रा. पडेगाव, कासंबरी दर्गाहजवळ), शेख दिलावर शेख मंजूर (वय ४२, रा. बारी कॉलनी, रोशनगेट परिसर), शेख जफर शेख फारूख (वय २६, रा. देवगिरी हायस्कूलमागे, दौलताबाद) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. या कारवाईत पोलिसांनी रिक्षा (एमएच २० बीटी ८५६५), इलेक्ट्रॉनिक वजन काटा, इलेक्ट्रीक मोटार, तीन गॅसच्या टाक्या असा १ लाख २५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.