ETV Bharat / state

पैठणमध्ये मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली - पैठण विधानसभा मतदारसंघ

पैठण विधानसभा निवडणुकीसाठी काल (सोमवार) मतदान प्रक्रियेला उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

मतदान केंद्रावरील गर्दी
author img

By

Published : Oct 22, 2019, 9:39 AM IST

औरंगाबाद - विधानसभा निवडणुकीसाठी काल (सोमवार) मतदान प्रक्रियेला उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. शहर आणि ग्रामीण भागातील मतदारांमध्ये मतदान करण्यासाठी विशेष उत्साह दिसून आला दुपारच्या वेळी अनेक मतदान केंद्रावर गर्दी दिसून आली.

मतदान केंद्रावरील गर्दी

पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या युवाशक्तिमध्ये मोठा उत्साह दिसत होता. शहरातील एकूण २९ मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पैठण विधानसभा मतदारसंघात एकूण २ लाख ९३ हजार ९२६ मतदार आहे. त्यापैकी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत २ लाख १० हजार २९३ झाले आहे. 71.55% मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याची माहिती तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी राजाभाऊ कदम यांनी दिली आहे.
पाचोड येथील जिल्हापरिषद शाळेच्या केंद्रावर आमदार भुमरे यांनी मतदान केले. तर पैठण शहरातील मतदान केंद्रावर राष्ट्रवादीचे दत्तात्रय गोर्ड यांनी सकाळीच सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, तालुक्यातील वाहेगाव येथील मतदान केंद्र क्र.४ वर इव्हीएम नादुरूस्त झाली होती. त्यामुळे जवळपास एक ते दीड तास मतदान प्रक्रिया प्रभावित झाली. तसेच ईसारवाडी मतदान केंद्र क्र. १७८ व दरेगाव जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्र.क्रमांक १३५ वरील ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड झाले. त्यानंतर लगेचच दुसर्‍या मशिनद्वारे प्रक्रिया पार पाडण्यात आली.

Intro:
आ.संदीपान भुमरे,दत्ता गोर्ड, विजय चव्हाण,डॉ.धोंडीराम पुजारी सह १५ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम बंद

विधानसभेसाठी पैठण तालुक्यात उत्साहपूर्ण वातावरणात शांततेत मतदान संपन्न
Body:पैठण- विधानसभा निवडणुकीकरिता सोमवार (दि.२१)रोजी सकाळी ७ वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. शहर आणि ग्रामीण भागातील मतदारांमध्ये मतदान करण्यासाठी विशेष उत्साह दिसून आला दुपारच्या वेळी अनेक मतदान केँद्रवर गर्दी दिसून आली अनेक मतदारानी सकाळीच मतदान करणे पसंत केल्याचे आमच्या प्रतिनिधी ने शहर व ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर फेरफटका मारले असता दिसून आले तालुक्यातील पिंपळवाड़ी,ढोरकीन,बिडकिन,चितेगाव,आडुळ, पाचोड,बालानगर,कडेठाण,दावरवाडी,नांदर,विहामांडवा,नवगाव,आपेगाव,लोहगाव आदि ग्रामीण भागासह शांततेत मतदान पार पडले.मात्र आयुष्यातील पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या युवाशक्ति मध्ये मोठा उत्साह दिसत होता शहरातील एकूण २९ मतदान केंद्रावर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता पैठण विधानसभा ११० मतदारसंघात एकूण २,९३,९२६ मतदार आहे त्यापैकी संध्याकाळ ६:०० वाजेपर्यंत 210293 झाले आहे. 71.55%.. मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याची माहिती तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी राजाभाऊ कदम यांनी दिली आहे
पाचोड येथील जिल्हापरिषद शाळेच्या केंद्रावर आ.भुमरे यांनी मतदान केले तर पैठण शहरातील मतदान केंद्रावर राष्ट्रवादी चे दत्तात्रय गोर्ड यांनी सकाळीच सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला
दरम्यान तालुक्यातील वाहेगाव येथील मतदान केंद्र क्र.४ वर इव्हीएम नादुरूस्त झाली होती त्यामुळे जवळपास एक ते दीड तास मतदान प्रक्रिया प्रभावित झाली तसेच ईसारवाडी मतदान केंद्र क्र. १७८ व दरेगाव जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्र.क्रमांक १३५ वरील ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड झाले त्यानंतर लगेचच दुसर्‍या मशिनद्वारे प्रक्रिया पार पाडण्यात आली शिवसेना-भाजप रिपाई महायुती चे उमेदवार आ.संदीपान भुमरे तर राष्ट्र्वादी-काँग्रेस महाआघाडी चे दत्तात्रय गोर्ड तसेच वंचित बहुजन आघाडी कडून विद्यामान जिल्हापरिषद सदस्य विजय चव्हाण एमआयएम कडून प्रल्हाद राठोड तसेच अपक्ष डॉ.धोंडीराम पुजारी सह ऐकून १५ उमेदवार निवडणूक रिंगणात नशिब अजमावत आहेत मात्र प्रमुख लढत आ.भुमरे विरुद्ध दत्ताभाऊ गोर्ड अशीच होणार असल्याचे आज झालेल्या मतदानावरुन दिसत आहे.दरम्यान कांग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनिल पटेल,राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष अप्पासाहेब निर्मळ,विनोद तांबे,हमीदखान सर,अनिल घोडके,पाशा धांडे भिकाजी आठवले नगरसेवक जितुसेठ परदेशी,बजरंग लिंबोरे,अप्पासाहेब गायकवाड,भाऊसाहेब पिसे,संजीव कोरड़े,गणेश पवार,इरफान बागवान,कल्याण भुकेले,जुनेद गाजी तर भाजपा- सेनेचे आ.संदीपान भूमरे,नगराध्यक्ष सूरज लोळगे, सभापती विलास भुमरे,नंदलाल काळे,सोमनाथ परदेशी,नगरसेवक तुषार पाटिल,तुषार शिसोदे,जितसिंग कारकोटक,,रफीक कादरी,अजीम कट्यारे,सादिक धांडे,लक्ष्मण औटे,ज्ञानेश्वर कापसे,शेखर पाटिल,डॉ. सुनील शिंदे,सुनील रासने,रेखाताई कुलकर्णी,नम्रता पटेल नामदेव खराद तर वंचित बहुजन आघाडी कडून तालुका अध्यक्ष राजेंद्र उगले,मौलाना रईस पठाण, बबलू बागवान तथा एमआयएम पक्षाकडून काजी कलीमुल्ला,तौसीफ कादरी,कय्यूम खतीब यानी मतदार केंद्राची पाहणी करून मतदानाचा टक्केवारी वाढणयासाठी प्रयत्न करताना दिसून आले..
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.