ETV Bharat / state

सिल्लोड तालुक्यात ओल्या दुष्काळाचा तिसरा बळी, शेतकऱ्याची नदीत उडी मारून आत्महत्या - गजानन जोशी आत्महत्या न्यूज

गजानन जोशी हे अल्पभूधारक शेतकरी होते. खरिपातील पीक वाया गेल्याने ते तणावात होते. 'जर पाऊस दोन दिवसांत थांबला नाही तर मी विहिरीत उडी घेईन', असे जोशी यांनी अनेकांजवळ बोलले होते.

सिल्लोड तालुक्यात ओल्या दुष्काळाचा तिसरा बळी, शेतकऱ्याची नदीत उडी मारून आत्महत्या
author img

By

Published : Nov 5, 2019, 2:18 PM IST

औरंगाबाद - सिल्लोड तालुक्यातील दहिगाव येथील शेतकरी गजानन विनायक जोशी (वय 35) यांनी शेतातील नुकसान झाल्याने नदीत उडी मारून आत्महत्या केली आहे.

हेही वाचा - 'अवकाळी' च्या थयथयाटात पीक जमीनदोस्त; पहा कवितेतून मांडली परभणीच्या शेतकऱ्याने आपली व्यथा

गजानन जोशी हे अल्पभूधारक शेतकरी होते. खरिपातील पीक वाया गेल्याने ते तणावात होते. 'जर पाऊस दोन दिवसांत थांबला नाही तर मी विहिरीत उडी घेईन', असे जोशी यांनी अनेकांजवळ बोलले होते. तीन दिवसांपूर्वी याच तालुक्यातील धानोरा गावात ओल्या दुष्काळाला कंटाळून एका शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. त्यानंतर, याच गावातील एका शेतकऱ्याला शेतातील नुकसान पाहून ह्रदय विकाराचा झटका आला होता.

Intro:सिल्लोड मध्ये ओल्या दुष्काळाचा तिसरा बळी

औरंगाबाद च्या सिल्लोड तालुक्यातील दहिगाव येथील शेतकरी गजानन विनायक जोशी वय 35 यांनी शेतातील नुकसान झाल्याने गावातील नदीत उडी घेवून आत्महत्या केल्याची केली.

गजानन जोशी हे अल्पभूधारक शेतकरी होते. खरिपातील पीक वाया गेल्याने ते तणावात होते.Body:दररोज पाऊस पडत आहे शेतातल वाया गेलेलं पीक बाजूला काढून रब्बी पिकाची तयारी करने आहे . जर 2 दिवस पाऊस थांबला नाही तर मी विहिरीत उडी घेईल असे गजानन जोशी अनेक जणांजवळ बोलत होता असे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले. Conclusion:तीन दिवसांपूर्वी सिल्लोड तालुक्यातील धानोरा गावातील ओल्या दुष्काळा ला कंटाळून एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. काल याच गावातील एका शेतकऱ्याला शेतातील नुकसान पाहून ह्रदय विकाराचा झटका आला तर आज दहिगाव येथील गजानन जोशी या शेतकऱ्यांने नदीत उडी घेवून आत्महत्या केली.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.