ETV Bharat / state

नापास होण्याची भीती ठरली निरर्थक, आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीला मिळाले ५४ टक्के गुण - दहावी

साक्षीने कुठलाही विचार न करता निकालाच्या तणावातून आपले जीवन एका क्षणात संपवून टाकले. मात्र, दहावीत नापास होण्याची तिची भीती निरर्थक होती हे निकालानंतर स्पष्ट झाले. दहावीचा निकाल प्रत्यक्ष जाहीर झाला आणि ती उत्तीर्ण झाली.

मृत साक्षी पांढरे
author img

By

Published : Jun 10, 2019, 10:54 AM IST

औरंगाबाद - दहावीच्या परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वीच १५ वर्षीय साक्षी अशोक पांढरे या विद्यार्थिनीने निकालाच्या भीतीने आत्महत्या केली होती. मात्र, शनिवारी दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर झाला अन् त्यात साक्षी ५३.६० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याचे समोर आले आहे. मात्र, हे यश पहायला आज ती या जगात नाही.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ औरंगाबाद विभाग

साक्षी शहरातील गारखेडा परिसरातील विजयनगरमध्ये राहत होती. ती उल्कानगरी भागातील विश्‍वभारती कॉलनीत असलेल्या जय भवानी विद्यामंदिरमध्ये शिकत होती. तिने मार्च महिन्यात दहावीची परीक्षा दिली होती. परीक्षेत पेपर अवघड गेल्याने ती तणावात होती. आपण परीक्षेत पास होऊ की नाही? या भीतीने तिने ३ जूनला सकाळी आठच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

साक्षीचे वडील अशोक पांढरे हे एका कंपनीच्या गाडीवर चालक असून तिची आई धुण्या-भांड्याचे काम करते. तिचा मोठा भाऊ अभियांत्रिकीचे शिक्षण घेतो. साक्षीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने पांढरे कुटुंब शोकसागरात बुडाले आहे. त्यातच शनिवारी दहावी परीक्षेचा निकाल ऑनलाईन जाहीर झाला. त्यामध्ये साक्षीला ५३.६० टक्के गुण मिळाल्याचे समोर आले. साक्षीने कुठलाही विचार न करता निकालाच्या तणावातून आपले जीवन एका क्षणात संपवून टाकले. मात्र, दहावीत नापास होण्याची तिची भीती निरर्थक होती हे निकालानंतर स्पष्ट झाले. दहावीचा निकाल प्रत्यक्ष जाहीर झाला आणि ती उत्तीर्ण झाली. मात्र, हे यश पाहण्यासाठी आज साक्षी जिवंत नसल्याचे दुःख तिच्या कुटुंबीयांना व्यक्त केले.

Intro:दहावी परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वीच पंधरा वर्षीय साक्षी अशोक पांढरे या विद्यार्थिनीने निकालाच्या भीतीने आत्महत्या केली. शनिवारी दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर झाला आणि त्यात साक्षी पांढरे ही ५३.६० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याचे समोर आले आहे. मात्र, हे यश पहायला आज ती या जगात नाही. 

Body:
शहरातील गारखेडा परिसरातील विजयनगरमध्ये राहणारी साक्षी पांढरे ही उल्कानगरी भागातील विश्‍वभारती कॉलनीत असलेल्या जय भवानी विद्यामंदिरमध्ये शिकत होती. तिने मार्च महिन्यात दहावीची परीक्षा दिली होती. परीक्षेत पेपर अवघड गेल्याने ती तणावात होती. आपण परीक्षेत पास होऊ की नाही, या भीतीने साक्षीने ३ जून रोजी सकाळी आठच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. साक्षीचे वडील अशोक पांढरे हे एका कंपनीच्या गाडीवर चालक असून, तिची आई धुण्या-भांड्याचे काम करते. तिचा मोठा भाऊ अभियांत्रिकीचे शिक्षण घेतो. साक्षीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने पांढरे कुटुंब शोकसागरात बुडाले. काल शनिवारी दहावी परीक्षेचा निकाल ऑनलाईन जाहीर झाला. त्यात साक्षीला ५३.६० टक्के गुण मिळाल्याचे समोर आले.साक्षीने कुठलाही विचार न करता निकालाच्या तणावातून आपले जीवन एका क्षणात संपवून टाकले. मात्र, तिला दहावीत नापास होण्याची जी भीती सतावत होती ती निरर्थक होती, हे निकालानंतर स्पष्ट झाले. दहावीचा निकाल प्रत्यक्ष जाहीर झाला आणि ती उत्तीर्ण झाली. मात्र, हे यश पाहण्यासाठी आज साक्षी जिवंत नाही.आज ती हयात असती तर खूप काही करू शकली असती.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.