ETV Bharat / state

उद्योगांची वीज महागली; सरकारने कमी केले अनुदान - उद्योगधंदे वीजदर वाढ

राज्यातील उद्योगधंद्यांसाठी मोठ्या प्रमाणात वीज लागते. उद्योजकांना सवलतीच्या दरात शासन वीज देते. मात्र, उद्योगांसाठी वीज बिलांमध्ये दिली जाणारी अनुदानाची रक्कम संपली आहे. त्यामुळे आता उद्योजकांना वाढीव दराने वीज घ्यावी लागणार आहे.

उद्योगांची वीज महागली
उद्योगांची वीज महागली
author img

By

Published : Feb 9, 2021, 12:05 PM IST

औरंगाबाद - कोविड परिस्थितीचा सामना करत उद्योग जगवणाऱ्या उद्योगाजकांना वीजदर वाढीचा शॉक बसला आहे. उद्योगांसाठी वीज बिलांमध्ये दिली जाणारी अनुदानाची रक्कम संपल्याने वीज बिल 15 टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे उद्योजक अडचणीत आले आहेत. राज्य सरकारने विजेवर सवलत आणखी वाढवून द्यावी, अशी मागणी औरंगाबादच्या उद्योगाजकांनी केली आहे.

सरकारने अनुदान कमी केल्याने उद्योगांची वीज महागली
मराठवाडा आणि विदर्भाच्या उद्योगांवर परिणाम -

मराठवाडा, विदर्भ या भागांमधील उद्योगवाढीसाठी राज्य सरकारने औद्योगिक वीज ग्राहकांना 2020-21 या आर्थिक वर्षासाठी 1 हजार 200 कोटी रुपयांचे अनुदान जाहीर केले होते. मात्र, अनुदानाची रक्कम डिसेंबर महिन्यात संपल्याने जानेवारीपासून येणाऱ्या बिलांमध्ये सवलत दिली गेली नाही. त्यामुळे वीज बिलात 15 टक्क्यांची वाढ झाली आहे. कोरोनामुळे अगोदरच आर्थिक घडी विस्कळीत झाली असताना विज बीलाचा आर्थिक भार सोसावा कसा? असा प्रश्न उद्योजकांसमोर निर्माण झाला आहे.

इंधन दर वाढीनंतर वीज दर वाढले -

उद्योजकांना मिळणारे काम टेंडर पद्धतीने मिळते. काम घेत असताना निश्चित केलेली रक्कम काम पूर्ण होईपर्यंत बदलता येत नाही. मागील काही दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. त्यामुळे माल वाहतूक महाग झाली आहे. त्यातच आता विजेवरचे अनुदान बंद झाल्याने विजेचे दर वाढले आहेत. त्यामुळे तयार होणाऱ्या मालाची किंमत वाढली आहे. मात्र, कंपन्यांसोबत झालेल्या करारानुसार जुन्या दरात मालनिर्मिती करावी लागत आहे. त्यामुळे उद्योगाजकांवर येणार आर्थिक भार वाढला आहे. महिन्याकाठी 40 ते 45 हजार वीज बिल भरणाऱ्या उद्योजकांना 50 ते 55 हजारांचे वीज बिल भरावे लागणार आहे. अशा परिस्थिती उद्योग अडचणीत येतील, अशी भीती औरंगाबादच्या उद्योगाजकांनी व्यक्त केली.

वीज बिलात सवलत वाढवून द्यावी -

युती सरकारच्या काळात उद्योगांना उभारी मिळावी यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज बिल अनुदान जाहीर केले. महाविकास आघाडीने हे अनुदान कायम ठेवले होते. कोविडच्या काळात उद्योग अडचणीत सापडले होते. या परिस्थितीत उद्योगाजकांनी आपला उद्योग सांभाळत शासनाला मदत केली. उद्योगाजकांना खरी गरज असताना राज्य सरकारकडून आणखी मदतीची अपेक्षा आहे. दिलेल्या वीज बिल अनुदानामुळे प्रति युनिट मागे दीड रुपया सूट मिळत होती. ही सूट कायम ठेवत वाढीव अनुदान देऊन उद्योग उभारणीत मदत करावी अन्यथा उद्योग अडचणीत सापडतील, असे मत औरंगाबादच्या उद्योगाजकांनी व्यक्त केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.