गंगापूर (औरंगाबाद) - दिवसेंवदिवस रासायनिक खतांच्या किंमती वाढत असल्याने शेतकऱ्यांचा पिकावरील उत्पादन खर्च वाढत आहे. रासायनिक खतांना पूरक पर्याय म्हणून सेंद्रिय आणि जैविक खते वापर हा शेतकऱ्यांनी करायला हवा. सेंद्रिय आणि जैविक खतांचा केल्याने शेतीवर होणारा खर्च कमी होईल व पीकही जोमात येईल. असे मत प्रगतशील शेतकरी राहुल कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
जैविक खतांचा वापर करून पीक जोमदार -
राहुल कुलकर्णी हे ऊस बागायतदार आहेत. शेतात ते वेगवेगळे प्रयोग करत असतात. ते दरवर्षी शेतातील ऊसाचे पाचट न जाळता शेतातच कुजवतात व त्याचा जैविक खत वापर करतात. त्यांनी ऊसाला रासायनिक खताचा एकच डोस व सेंद्रिय आणि जैविक खतांचा वापर करून पीक हे जोमदार आणले आहे.
सेंद्रिय आणि जैविक खतामुळे उत्पादन खर्चात बचत -
शेतात पाचट किंवा काड कुजवून विनामूल्य सेंद्रिय खत उपलब्ध होते. यातून जमिनीचा पोत देखील सुधारतो. सेंद्रिय कर्ब वाढल्याने खते ही पिकाला लागू होतात. सेंद्रिय सोबत फवारणी किंवा ठिबक सिंचनातून कमी किंमतीत मिळणारी जैविक खते देता येतात. सेंद्रिय आणि जैविक खतांमुळे पिकाला रासायनिक खताचे तीन डोस ऐवजी एक किंवा दोनच डोस पुरेसे होतात. सेंद्रिय आणि जैविक खतामुळे उत्पादन खर्चात बचत होते. जमीन आणि पर्यावरणाचे संतलून टिकून राहण्यास मदत होते. गेल्या चार वर्षांपासून ऊस पिकात पाचट कुजवून सेंद्रिय खत करत आहे. हिरवळीच्या खताचाही उपाय केला आहे. असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा - अकरावीचे प्रवेश सुरू करणाऱ्या महाविद्यालयांना शिक्षण संचालकांनी झापले