ETV Bharat / state

KCR in Sambhajinagar :...तर मी महाराष्ट्रात परत येणार नाही; केसीआर यांचा देवेंद्र फडणवीसांना टोला, केंद्र सरकारही टार्गेटवर - केसीआर यांची देवेंद्र फडणवीसांवर टीका

तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची सोमवारी (24 एप्रिल) छत्रपती संभाजीनगर येथे जाहीर सभा झाली. यावेळी केसीआर यांनी शेतकरी, पाणी, वीज या मुद्द्यांवरून केंद्र सरकार तसेच राज्य सरकारवर जोरदार टीका केली. राज्य सरकारने तेलंगाणासारख्या सुविधा जनतेला द्याव्यात, तर मी महाराष्ट्रात परत येणार नाही, असे म्हणत केसीआर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला.

Etv Bharat
केसीआर
author img

By

Published : Apr 24, 2023, 8:28 PM IST

Updated : Apr 24, 2023, 10:36 PM IST

तेलंगाणाचे मुख्यमंत्री केसीआर

छत्रपती संभाजीनगर - श्रीमंत हे दिवसाला श्रीमंत होत चालले आहेत, तर गरीब हे अजून गरीब होत चालले आहेत. दिवसाला अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत. याला केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप केसीआर यांनी छत्रपती संभाजीनगर येथील सभेवेळी केला आहे. तसेच त्यांनी मोदी सरकारवरही टीका केली आहे. शेतकरी आत्महत्या, पाणी व वीजेचा मुद्दा हा केसीआर यांच्या सभेचा अजेंडा असल्याचे दिसून आले.

देवेंद्र फडणवीस टार्गेटवर - केसीआर यांनी 'अब की बार किसान सरकार'चा नारा दिला. ते पुढे म्हणाले, शेतकरी शेतात जातो, तो आमदार, खासदार का होत नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत होते की, तुम्ही महाराष्ट्रात कशाला येता. पण मी म्हणालो तेलंगाणासारखे राज्य करा, मी लगचे मध्य प्रदेशात जाईल. तसेच दलीत बंधू सुरू करा, मी महाराष्ट्र सोडून जाईल, असे म्हणत केसीआर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले आहे.

देशाचा विकास करणे गरजेचे - केसीआर म्हणाले की, आपला देश ऐतिहासिक परंपरा असणारा देश आहे. आपल्याला काही ध्येय आहे असे वाटते का? ते हरवले आहे अशी शंका आहे. मी म्हणतो ते ऐकून सोडू नका, त्यावर चर्चा करा. खर खोटं समोर येईल. देशाने आपल्याला ध्येय नसेल तर आपला देश कुठे जाईल, हे कोणाचे पाप आहे. असा प्रश्न केसीआर यांनी विचारला आहे. ते पुढे म्हणाले की, नवे लक्ष नवीन सकाळ घेऊन पुढे जावं लागेल. आपल्या देशाचा विकास आपल्याालाच करावा लागणार आहे. आपला देश बदलण्यासाठी इतर देशाचे नागरिक येणार नाहीत. त्यामुळे आपल्यालाचा आपल्या देशाचा विकास करावा लागेल.

प्रत्येक घराघरात पाणी देणार - महाराष्ट्रातल्या नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही, इतक्या नद्या असून काय उपयोग. आर्थिक राजधानी मुंबई आहे. मात्र, पिण्याच्या पाण्याची सोय नाही. आम्ही चंद्र, तारे मागत नाहीत, फक्त पाणी मागत आहोत. महाराष्ट्रात बीआरएसचे सरकार आणा, आम्ही राज्यातील प्रत्येक घराघरात पिण्याचे पाणी देणार, असे आश्वासन तेलंगाणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी संभाजीनगर येथील सभेत दिले.

जातियवाद, दंगली वाढल्या - केसीआर पुढे म्हणाले की, असा देश पुढे राहिला पाहिजे का बदलला पाहिजे? बेरोजगारी वाढत आहे, अनेक उद्योग बंद होत आहेत. कामगार रस्त्यावर येत आहेत. देशात जातिवाद, भांडण वाढत आहेत. गरीब गरीब होत आहे. तर श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत. हे खोटं नाही कडवट सत्य आहे. सभेवेळी के चंद्रशेखर राव म्हणाले की, हे असेच सुरू राहावे वाटत का? यात बदल नको आहे का तुम्हाला? युवा शक्ती आजचे डॉक्टर आहेत. आमचा काळ गेला आता तुम्हाला उज्वल भविष्य पाहिजे हा प्रश्न आहे. त्यामुळे आपला मार्ग निवडा, आपल्याला आपले प्रश्न स्वतः ला सोडवावे लागतील. जेवढ्या लवकर आपण बदल घडवू तेवढे चांगले. उशीर करून फायदा नाही.

स्वतः वाघ व्हा : एखादा पक्ष जिंकला किंवा हरला म्हणजे बदल नाही. चांगले धोरण पाहिजे. अनेक पक्ष आले, जिंकले मात्र समस्या तशाच आहेत. शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहेत. पंतप्रधान आणि राजकीय नेत्यांना त्याचे काय पडले. ते बाहेरचे वाघ दाखवून खुश आहेत. त्यामुळे तुम्हाला विनंती करतो स्वतः वाघ व्हा, म्हणजे बदल घडेल, असे केसीआर म्हणाले. तसेच अनेकांना संधी देण्यास मोठा काळ गेला. आपल्यापेक्षा जास्त वाईट अवस्था असलेला चायना प्रगती करतो. जपान आणि इतर देश पुढे जात आहेत. आता बाहेर जाऊन नव्या रंगात, जोमात भारत बदल करू शकतो. जुन्या गोष्टीमुळे देश बदलणार नाही, असेही केसीआर यावेळी म्हणाले.

सर्वसामान्यांसाठी काम करतो - परिवर्तनामुळे देश पुढे जाऊ शकतो, त्यामुळेच बीआरएस पक्षाचा जन्म झाला. कोणत्या जातीसाठी नाही तर सामान्यांच्या न्यायासाठी आमचा जन्म झाला आहे. त्यामुळे घाबरून चालणार नाही, चांगल्या भावणाने काम केले तर विजय आपला होईल, असेही केसीआर या सभेवेळी म्हणाले.

हेही वाचा - Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या तोंडी फक्त शिवराळ भाषा; देवेंद्र फडणवीसांची टीका

Last Updated : Apr 24, 2023, 10:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.