ETV Bharat / state

Measles Patients : गोवरचा अहवाल मिळण्यास लागतात पाच दिवस, गोवर बरा होतो सात दिवसात....

गोवर रूग्णसंख्येच्या ( Measles Patients ) संशयितांचा तपासणी अहवाल प्राप्त होण्यास चार ते पाच दिवसांचा कालावधी लागतो. या काळात अनेक रुग्ण बरे देखील होतात. परिणामी त्याचा परिणाम उपचारावर होत आहे. आधी रुग्ण संख्य कमी असल्याने उशीर होत होता, मात्र आता अहवाल लवकर प्राप्त होतील, अशी माहिती मनपा आरोग्य अधिकारी डॉ पारस मंडलेचा यांनी दिली.

author img

By

Published : Nov 28, 2022, 4:33 PM IST

Etv Bharat
Etv Bharat

औरंगाबाद : मुंबई, भिवंडी नंतर औरंगाबाद गोवरच्या रूग्णसंख्येत ( Measles Patients ) वाढ होत आहे. आतापर्यंत चौघांचा अहवाल सकारात्मक आले आहे. त्यामुळे आता महानगरपालिका अलर्ट मोडवर आली आहे. मात्र संशयितांचा तपासणी अहवाल प्राप्त होण्यास चार ते पाच दिवसांचा कालावधी लागतो. या काळात अनेक रुग्ण बरे देखील होतात. परिणामी त्याचा परिणाम उपचारावर होत आहे. आधी रुग्ण संख्य कमी असल्याने उशीर होत होता, मात्र आता अहवाल लवकर प्राप्त होतील, अशी माहिती औरंगाबाद महानगरपालिकाचे आरोग्य अधिकारी डॉ पारस मंडलेचा ( Health Officer Dr Paras Mandlecha ) यांनी दिली.

चाचणी होते मुंबईत - गोवरच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 41 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. तर काही जणांची तपासणी लवकरच करण्यात येईल. या सर्वांची तपासणी केल्यानंतर त्यांचे नमुने मुंबईत हापकिन केंद्रात पाठवले जातात. त्या ठिकाणी तपासणी झाल्यावर तो अहवाल प्राप्त होतो. साधारणतः अहवाल प्राप्त होण्यास चार ते पाच दिवसांचा कालावधी लागत आहे. गोवरच्या रुग्णांवर सात ते आठ दिवस उपचार केल्यावर तो या आजारातून बाहेर पडतो. अहवाल येण्यास पाच दिवसांचा जर वेळ लागला तर निश्चित उपचार करण्यात अडचणी होतात, अशी माहिती वैद्यकीय तज्ञांनी दिली आहे.

औरंगाबाद महानगरपालिकाचे आरोग्य अधिकारी डॉ पारस मंडलेचा माहिती देताना

महानगरपालिकेने सुरू केले अलगीकरण कक्ष - कोविडच्या महामारीमध्ये अलगीकरण कक्ष ही संकल्पना सर्वसामान्यांना लक्षात आली. कोविड संपला आता या कक्षाची पुन्हा गरज पडणार नाही, असे सर्वसामान्यांना वाटत होते. मात्र गोवर मुळे पुन्हा विलगीकरण कक्ष उभारण्याची वेळ आली आहे. महानगरपालिकेने मेल्ट्रॉन हॉस्पिटल येथे अलगीकरण कक्ष सुरू केले आहे. सध्या या कक्षात रुग्ण दाखल झाले नसले तरी देखील पालिकेने कक्ष उभारला आहे. ज्या ठिकाणी घरी अलगीकरण करणे शक्य नाही, अशावेळी या विलगीकरण कक्षात मुलांना ठेवले जाईल, अशी माहिती मनपा आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली.

पालिकेतर्फे जनजागृती - औरंगाबाद शहरात काही ठराविक भागांमध्ये गोवरचे रुग्ण आढळून येत आहे. त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहे. कर्मचाऱ्यांच्या मदतीने तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. तर जनजागृती करण्यासाठी विशेष मोहीम पालिकेने राबवली आहे. यामध्ये प्रत्येक भागात बॅनर आणि पोस्टर लावून गोवर मध्ये मुलांची काळजी कशी घ्यावी याबाबत माहिती स्पष्ट करण्यात आली आहे. तर दुसरीकडे मुस्लिम बहुल भागांमध्ये उर्दू भाषेत बॅनर लावण्यात आले असून मजीद मध्ये देखील त्याबाबत जनजागृती करण्याचे काम केले जात आहे. गोवरची साथ आटोक्यात ठेवण्यासाठी पालिका काम करत असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.