औरंगाबाद - शहरात गोवरचे संशयित रुग्ण ( measles patients in Aurangabad city ) आढळल्याचे माहिती समोर आली आहे. शताब्दी नगर, रहेमानिया कॉलनी येथे गोवरचे आठ संशयित रुग्ण ( measles patients in Aurangabad ) आढळून आले आहे. या मुलांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी मुंबई येथील हपकिंग लॅबोरेटरी ( Hopking Laboratory Mumbai ) येथे पाठवण्यात आले आहेत. तर त्या ठिकाणी आता महानगरपालिका ( Aurangabad Municipality ) सर्वेक्षण सुरू करणार असल्याची माहिती पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेच्या यांनी दिली आहे.
रुग्ण आले आढळून - मुंबईसह भिवंडी येथे गोवरच्या साथीचे रुग्ण आढळून आल्यानंतर राज्यभर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. त्याचा एक भाग म्हणून सर्वत्र खबरदारी घेण्यात येत आहे. सर्दी, ताप, डोळे लाल होणे, अंगावर पुरळ येणे, खोकल्यासारखी लक्षण असलेल्या बालकांच्या रक्ताचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात येत आहेत. त्यात शहरातील शताब्दी नजर येथे सहा, रहमानिया कॉलनी येथे दोन संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यांचे रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे अधिकारी डॉक्टर मुजीब यांच्यासह मनपाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी शताब्दी नगर भागात भेट देऊन संशयित रुग्णांची पाहणी केली. तर मागील काही दिवसात आढळून आलेल्या रुग्णांचे आरोग्य चांगले असल्याची माहिती मनपा आरोग्य अधिकारी डॉ पारस मंडलेचा यांनी दिली.
शहरात होणार सर्वेक्षण - आशा वर्कर च्या माध्यमातून शताब्दी नगर आणि रहमानिया कॉलनी येथे गोवर सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. गोवर रुग्णांची जीवनसत्व "अ" दोन डोस दिले जात आहेत. त्या भागात विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले असून ज्या बालकांचे लसीकरण राहिले आहे, त्यांची यादी तयार करून त्यांना लस दिली जात आहे. सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र देऊन गोवर रुग्णांची माहिती देण्याबाबत कळवण्यात आले असल्याचं मनपा आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितलं.