औरंगाबाद: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमन आहेरेवाल हा बारावीच्या परीक्षा जवळ आल्याने तो या परीक्षेची तयारी करत होता. कुलभूषण गायकवाड हा बारावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. वडील एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. तर एक भाऊ पुण्यात नोकरी करतो. 12वीच्या परीक्षेला काही तासांचा वेळ शिल्लक राहिला होता. अशातच अमनने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली.
तो कायमचाच झोपी गेला: माहितीनुसार अमनने सायंकाळी जेवण केल्यानंतर तो तिसऱ्या मजल्यावरील अभ्यासाच्या खोलीत झोपण्यासाठी गेला होता. मात्र तो सोमवारी खाली आलाच नाही. यामुळे दुपारी जेवणासाठी आजोबा अमनला बोलावण्यासाठी गेले असता त्यांना अमन बेशुद्धावस्थेत आढळला. यानंतर नातेवाइकांनी त्याला तातडीने बेशुद्ध अवस्थेत घाटी रुग्णालयात नेले. परंतु डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
डोक्यात गोंगवत होता विचार: स्पर्धेच्या युगात अभ्यासाचा ताणतणाव वाढला आहे. परीक्षेत चांगले गुण मिळवण्याचे आव्हान विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होते. त्याच भीतीमुळे आत्महत्येसारखे पाऊल उचलले जाते. तसेच काहीसे अमनच्या बाबतीत घडले. बारावीची परीक्षा अवघ्या काही तासात आल्याने, परीक्षेच्या तणावातून आत्महत्या केली असल्याचा अंदाज पोलिसांना आहे. आत्महत्या करण्याचा निश्चय आधीच केला असल्याने अमनने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र तणाव मुक्त परीक्षेसाठी प्रशासन प्रयत्न करता असताना अमनने टोकाचे पाऊल उचलले.
डॉक्टर विद्यार्थिनीचीही अशीच आत्महत्या: एमबीबीएसच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टर विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 17 जानेवारी, 2023 रोजी लातूरात घडली होती. मृत मुलीचे नाव साक्षी राजेंद्र गायकवाड (वय 21 वर्षे ) होते.
परीक्षेच्या आधीच आत्महत्या: मुळची औरंगाबाद येथील रहिवासी असलेली साक्षी गायकवाड (वय 19 वर्षे) लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या प्रथम वर्षात शिकत होती. 18 जानेवारी,2023 पासून एमबीबीएसच्या प्रथम वर्षाची परीक्षा सुरू होणार होती. परंतु आदल्या दिवशीच तिने जीवन संपवले.
आत्महत्येचा निर्णय का घेतला? डॉक्टर साक्षी ही अभ्यासात हुशार होती. तिच्या संदर्भात जवळच्या मैत्रिणींनी कोणतेही संभ्रमात्मक बाब अद्यापही प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेली नाही. याप्रकरणी शहरातील गांधी चौक पोलीसांत आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली होती. आत्महत्येचा निर्णय घेतला त्या अगोदर साक्षीचे कुणाशी काही बोलणे झाले होते का याचीही चौकशी केली जात आहे.