ETV Bharat / state

विद्यार्थ्यांनी थेट औरंगाबाद जिल्हा परिषदेत भरवली शाळा; शिक्षक देण्याची मागणी - औरंगाबाद

औरंगाबाद पासून साधारणतः १०० किलोमीटर अंतरावर वैजापूर तालुक्यात नायगव्हान येथे जिल्हा परिषदेची शाळा भरते. एकेकाळी सर्वशाळांसमोर आदर्श असलेली ही शाळा आज मात्र बंद पडण्याच्या मार्गावर आहे. कारण या शाळेत विद्यार्थ्यांना शिकवायला शिक्षकच उपलब्ध नाही. त्यामुळे शाळेला कुलूप लावण्याची वेळ आली आहे.

औरंगाबाद जिल्हा परिषदेत आंदोलन करताना विद्यार्थी
author img

By

Published : Jun 24, 2019, 10:54 AM IST

औरंगाबाद - जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील नायगव्हानच्या जिल्हापरीषद शाळेत एकच शिक्षकची नेमणूक करण्यात आली. हे शिक्षक गैरहजर असले तर विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत नाही. त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांना घेऊन थेट औरंगाबाद जिल्हा परिषदेत शाळा भरवत आंदोलन केले.

औरंगाबाद जिल्हा परिषदेत आंदोलन करताना विद्यार्थी

औरंगाबाद पासून साधारणतः १०० किलोमीटर अंतरावर वैजापूर तालुक्यात नायगव्हान येथे जिल्हा परिषदेची शाळा भरते. या शाळेत पहिली ते चौथी या वर्गांमध्ये 28 विद्यार्थी शिक्षण घेतात. तर नव्या शैक्षणिक वर्षात दहा ते बारा विद्यार्थी नव्याने प्रवेश घेणार आहेत. एकेकाळी सर्वशाळांसमोर आदर्श असलेली ही शाळा आज मात्र बंद पडण्याच्या मार्गावर आहे. कारण या शाळेत विद्यार्थ्यांना शिकवायला शिक्षकच उपलब्ध नाही. त्यामुळे शाळेला कुलूप लावण्याची वेळ आली आहे.

लोखंडे नावाचे एकच शिक्षक पहिली ते चौथी या वर्गातील २८ विद्यार्थ्यांना शिकवतात. त्या शिक्षकांना देखील जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी बैठकीला बोलावले तर ते देखील शाळा उघड्यावर सोडून निघून जातात. त्यामुळे पहिल्या वर्गात १० विद्यार्थ्यांचे प्रवेश पालकांनी थांबले आहेत, तर पाचवीचा वर्ग बंद होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे गरीब विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या जिल्हा परिषद शाळेला शिक्षक द्या, या मागणीसाठी नायगव्हान येथील जिल्हापरिषदेच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेत शाळा भरवत आंदोलन केले. दोन तास आंदोलन केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शिक्षक देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.

Intro:शाळेत शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांनी थेट जिल्हापरीषदेत शाळा भरवत आंदोलन केल. वैजापूर तालुक्यातील नायगव्हानच्या जिल्हापरीषदेत एकच शिक्षक नेमण्यात आला असून शिक्षकांच्या गैरहजेरी मुळे विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत नाहीये. शिक्षक नसल्याने मुलांचं शैक्षणिक नुकसान होत असल्याने आपल्या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांना घेऊन पालकांनी जिल्हा परिषदेत शाळा भरवली.

Body:नायगव्हान येथील जिल्हापरिषदेच्या शाळेत पहिली ते चौथी या वर्गांमध्ये 28 विद्यार्थी शिक्षण घेतात. तर नव्या शैक्षणिक वर्षात दहा ते बारा विद्यार्थी नव्याने दाखल घेणार आहेत. मात्र एकाच शिक्षकाच्या भरवश्यावर शाळा भरत असल्याने कोणतेही नवे विद्यार्थी शाळेत दाखल घ्यायला तयार नाहीत. गेली काही वर्षे शिक्षक देण्याची मागणी होत आहे मात्र जिल्हापरिषद शिक्षण विभाग लक्ष देत नसल्याने संतप्त पालकांनी आपला मोर्चा जिल्हापरिषदेकडे वळवला.

Conclusion:औरंगाबाद पासून साधारणतः शंभर किलोमीटर अंतरावर वैजापूर तालुक्यात नायगव्हान येथे जिल्हा परिषदेची शाळा भरते. ही शाळा भरत असली तरी या शाळेची वेगळीच समस्या आहे. एकेकाळी सर्वशाळांसमोर आदर्श असलेली ही शाळा मात्र आज बंद पडण्याच्या मार्गावर आहे. कारण या शाळेत विद्यार्थ्यांना शिकवायला शिक्षकच उपलब्ध नसल्याने शाळेला कुलूप लावण्याची वेळ आली आहे. लोखंडे नावाचे एकच शिक्षक पहिली ते चौथी या वर्गातील 28 विद्यार्थ्यांना शिकवतात. त्या शिक्षकांना देखील जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी बैठकीला बोलावलं तर ते देखील शाळा उघड्यावर सोडून निघून जातात. त्यामुळे पहिल्या वर्गात दहा विद्यार्थ्यांचे प्रवेश पालकांनी थांवलेत तर पाचविचा वर्ग बंद होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे गरीब विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या जिल्हा परिषद शाळेला शिक्षक द्या या मागणीसाठी नायगव्हान येथील जिल्हापरिषदेच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेतच शाळा भरवत आंदोलन केले. दोन तास आंदोलन केल्या नंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शिक्षक देण्याचे आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.
byte - विद्यार्थी
byte - पालक
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.