औरंगाबाद - जिल्ह्यातील शेकटा परीसरात अज्ञात आरोपीने बसवर दगडफेक केली आहे. बसवर अज्ञात व्यक्तीने दगड फेक केली. या घटनेत बसच्या पाठीमागील बाजूच्या खिडकीच्या काचा फुटल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच जालन्यातील बदनापूर पोलिसांनी पोलीस संरक्षणात ही बस आणून जालना पोलिसांच्या ताब्यात सोपवली. त्यानंतर जालना पोलिसांनी ही बस जालना आगारात आणून सोडली आहे. दरम्यान, बसवर दगडफेक करणाऱ्या अज्ञातांचा पोलीसनी शोध सुरू केला आहे.
औरंगाबादहून निघाली होती बस...
औरंगाबाद जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना शनिवारी काही कर्मचारी सेवेत रुजू झाले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रतीक्षेनंतर लाल परी पुन्हा रस्त्यावर धावली होती. ही बस औरंगाबाद ते जालना या मार्गावर बस सोडण्यात आली होती. मोठ्या पोलीस बंदोबस्तात बस डेपोतून निघाली होती. काही कर्मचारी कामावर रुजू झाले असले तरी संप अद्याप कायम आहे. त्याचाच राग म्हणून बस वर दगडफेक झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
हे ही वाचा - लस घेतली नसेल तर आता मिळणार नाही दारू; औरंगाबादमध्ये नवा नियम