ETV Bharat / state

VIDEO : कृषीमंत्र्यांची 'नायक' स्टाईल रेड.. साठा असूनही युरीया नाकारणाऱ्या दुकानदाराला दणका - dada bhuse news

औरंगाबाद येथे युरिया मिळत नसल्याच्या अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या. त्याची दखल घेत कृषीमंत्री दादा भुसे यांनी आज (रविवारी) दुपारी औरंगाबाद शहराला अचानक भेट दिली. जिल्हा यंत्रणेला न कळवता ते थेट बाजार समितीच्या आवारातील नवभारत फर्टीलायझर या दुकानात स्वत: कृषिमंत्री सामान्य शेतकरी म्हणून गेले. त्यांनी दुकानदाराकडे १० गोणी युरिया मागितला. त्यावर युरिया शिल्लक नसल्याचे दुकानदाराने सांगितले. १० ऐवजी पाच गोण्यांची मागणी केल्यावरही दुकानदाराने युरिया दिला नाही.

कृषी राज्यमंत्री दादा भुसे
कृषी राज्यमंत्री दादा भुसे
author img

By

Published : Jun 21, 2020, 10:10 PM IST

Updated : Jun 22, 2020, 10:15 AM IST

औरंगाबाद - राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी शहरात ग्राहक बनून एका दुकानात स्टिंग ऑपरेशन केले. शेतकरी बनून गेलेल्या भुसे यांनी दुकानदाराला युरियाची मागणी केली. मात्र, दुकानदाराने उपलब्ध असुनही युरिया नसल्याचे सांगितले. यानंतर भुसेंनी दुकानदारावर कारवाई करत गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. राज्यभरातील कृषी दुकानदारांनी शेतकऱ्यांना विशिष्ट कंपनीचीच खते, बियाणे घेण्याची सक्ती करू नये, शिल्लक असतानाही युरिया शेतकऱ्यांना न देणे या बाबी खपवून घेतल्या जाणार नाहीत, अशा इशाराही कृषिमंत्र्यांनी दिला आहे.

VIDEO : 'नायक' स्टाईल रेड.. चक्क राज्याच्या कृषी मंत्र्यांनीच शेतकऱ्याच्या वेशात जाऊन केले स्टिंग ऑपरेशन

औरंगाबाद येथे युरिया मिळत नसल्याच्या अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या. त्याची दखल घेत कृषीमंत्री दादा भुसे यांनी आज (रविवारी) दुपारी औरंगाबाद शहराला अचानक भेट दिली. जिल्हा यंत्रणेला न कळवता ते थेट बाजार समितीच्या आवारातील नवभारत फर्टीलायझर या दुकानात स्वत: कृषिमंत्री सामान्य शेतकरी म्हणून गेले. त्यांनी दुकानदाराकडे १० गोणी युरिया मागितला. त्यावर युरिया शिल्लक नसल्याचे दुकानदाराने सांगितले. १० ऐवजी पाच गोण्यांची मागणी केल्यावरही दुकानदाराने युरिया दिला नाही.

यानंतर दुकानामध्ये शिल्लक साठ्याच्या फलकावर युरीया शिल्लक असल्याचे निदर्शनास आणून देतानाच स्टॉक रजिस्टरची मागणी कृषिमंत्र्यांनी केली. ते घरी असल्याचे दुकानदाराने सांगितले. त्यानंतर कृषिमंत्र्यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांना दुकानात बोलावून घेतले. युरिया शिल्लक असतानाही तो शेतकऱ्यांना दिला जात नाही, यावर भुसे यांनी तीव्र नाराजी दर्शविली.

दुकानाचा आणि गोदामाचा पंचनामा केल्यानंतर दुकानात युरीयाच्या 1 हजार ३८६ पिशव्या शिल्लक असल्याचे आढळून आले. यानंतर मंत्री भुसेंनी दुकानदारावर कारवाई करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. जिल्हा कृषी अधीक्षकांमार्फत त्या दुकानाचा आणि गोदामाचा पंचनामा करण्यात आला.

याप्रकारानंतर औरंगाबाद येथील कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे निर्देशही कृषीमंत्री भुसेंनी दिले. तसेच दुकानातूनच कृषी विभागाच्या सचिवांना दूरध्वनीकरून यंत्रणांनी अधिक प्रभावी कार्यवाही करण्याची गरज असल्याच्या सूचना दिल्या.

Last Updated : Jun 22, 2020, 10:15 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.