औरंगाबाद - दोन दिवस राज्यभर एसटी कर्मचारी संघटनांच्या काही मागण्या मान्य केल्यावर आंदोलन मागे घेण्यात आल्याची घोषणा संघटनांनी केली असली तरी कामगारांनी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. एसटी राज्य सरकारमध्ये समाविष्ठ करून घ्या ही मागणी मंजूर होई पर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला.
शहर बस सेवेवर झाला परिणाम -
एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारल्याने शहर बस सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. दोन दिवसांच्या आंदोलनात भत्ते आणि वेतन बाबत मागण्या मान्य झाल्या असल्या तरी मुख्य मागणी बाबत कुठलाही निर्णय घेतला नाही. किंबहुना त्यावर चर्चादेखील झाली नाही. त्यामुळे संघटना नाही. मात्र, कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे, अशी माहिती चिकलठाणा एसटी कार्यशाळेतून कर्मचाऱ्यांनी दिली.
हेही वाचा - एसटी कर्मचाऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये; कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येबाबत अॅड. अनिल परब यांची प्रतिक्रिया
एसटीचा प्रवासी कर्मचाऱ्यांसोबत -
राज्यातील एस.टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप परीवहन महामंडळाचे धोरणात्मक निर्णय न घेतल्यामुळे करण्यात आला आहे. राज्यातील एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांवर अतिशय तुटपुंजा वेतनावर काम करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे कर्मचारी प्रचंड मोठ्या संकटातून आहेत. शेतकरी आत्महत्येप्रमाणे एसटी कामगार आत्महत्या करू लागला आहे. एसटी बसकडे ग्रामीण भागामध्ये जीवनवाहिनी म्हणून पाहिले जाते. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांना खुपच कमी वेतन असल्यामुळे त्यांच्या कुटुंबाची काय परिस्थिती आहे? उघड्या डोळ्याने दिसत आहे. एस.टी. कर्मचारी वाचवण्याची जबाबदारी सरकारवर आहे. दिवाळीच्या काळामध्ये प्रवाशांचे हाल होत असतील तरी प्रवाशांमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सहानुभुतीचे वातावरण असून कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी ग्रामीण भागातील प्रवासी देखील त्रास सहन करायला तयार आहे, असे मत एसटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले.