औरंगाबाद : मागील दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन ( ST workers' agitation ) सुरू आहे. एसटी महामंडळाचे शासनात विलगीकरण करा, या मागणीसाठी राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. औरंगाबादच्या मुख्य बसस्थानकात ( Aurangabad main bus stand )मागील दोन महिन्यांपासून आंदोलन हे सुरू आहे. आंदोलनात रोज सकाळी आंदोलक कर्मचारी मुख्य बस स्थानकात आंदोलनासाठी दाखल होतात. तसेच संध्याकाळपर्यंत ठिय्या देऊन आंदोलन करत आहेत. अद्याप मागणी मान्य झाली नसली तरी लवकरच मागण्या मान्य होतील, असा विश्वास कर्मचाऱ्यांना आहे. त्यामुळे मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.
आता घरूनच होईल आंदोलन -
कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत ( Corona infection is on the rise ) आहे. त्यामुळे आंदोलक कर्मचारी आजारी पडण्याची भीती नाकारता येत नाही. त्यात सरकारच्या वतीने गर्दी टाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेl. आंदोलन जरी महत्त्वाच असलं तरी, कर्मचारी देखील तितकाच महत्त्वाचा आहे. आंदोलन कर्मचाऱ्यांना एकत्र आल्यावर कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी आता घरीच राहून आंदोलन केले जाईल. अशी भूमिका औरंगाबादच्या मुख्य बस स्थानकात बुधवारी दुपारच्या सुमारास पार पडलेल्या बैठकीत ( ST staff held meeting on Wednesday ) घेण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे एसटीचे आंदोलन कर्मचारी आपल्या घरीच राहून आंदोलन ( Will agitate from home ) सुरू ठेवतील. तसेच जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही, तोपर्यंत तीन ते चार आंदोलक आंदोलनस्थळी येतील आणि बाकीचे घरीच राहतील आणि हा लढा असाच सुरू राहील अशी माहिती आंदोलक कर्मचाऱ्यांनी दिली.
हेही वाचा - Aurangabad Lawyer Denied House : औरंगाबाद खंडपीठात काम करणाऱ्या वकिलाला जातीमुळे नाकारले घर; तक्रार दाखल -