ETV Bharat / state

औरंगाबादमध्ये वाढले कोरोनाचे 63 नवे रुग्ण; आकडा 1700 पार - औरंगाबाद लेटेस्ट न्यूज

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1767 वर पोहोचली असून 1113 जण कोरोनामुक्त झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 5 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

aurangabad corona update
औरंगाबाद कोरोना अपडेट
author img

By

Published : Jun 4, 2020, 9:39 AM IST

औरंगाबाद- जिल्ह्यात गुरुवारी सकाळी नवे 63 कोरोनाबाधित आढळले. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1767 झाली आहे. 1113 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले तर, 89 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

63 कोरोनाबाधित रुग्णांमध्ये बेगमपुरा (2), लेबर कॉलनी (1), पडेगाव (1), बायजीपुरा (1), हर्सुल परिसर (1), भारतमाता नगर (1), संजय नगर, मुकुंदवाडी (1), रोशन गेट (2), देवळाई चौक परिसर (1), समर्थ नगर (1), शिवशंकर कॉलनी (5), शिवाजी कॉलनी (1), सईदा कॉलनी (1), चेतना नगर (2), एन-सात सिडको (1), एन-2विठ्ठल नगर (1), विनायक नगर, जवाहर कॉलनी (1), बारी कॉलनी (1), हनुमान नगर, गारखेडा (1), मिल कॉर्नर (1), एन चार (1), क्रांती नगर (1), विजय नगर, गारखेडा (1), एन सहा संभाजी कॉलनी (6), अयोध्या नगर (1), न्यू हनुमान नगर (1), कैलास नगर (1), अजिंक्य नगर, गारखेडा (3), एन 1, सिडको (1), सुंदर नगर, पडेगाव (1), गणेश कॉलनी (2), एन चार, समृद्धी नगर,सिडको (2), कटकट गेट, नेहरू नगर (1), आंबेडकर नगर, एन -7 (3), जय भवानी नगर (1), राजा बाजार (4), अन्य (6) या भागातील व्यक्तींचा समावेश आहे. यामध्ये 26 महिला आणि 37 पुरुष रुग्ण आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात 24 तासांत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये समता नगरातील कोरोनाबाधित असलेल्या 43 वर्षीय पुरुष रुग्णाचा बुधवारी सायंकाळी 6 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. आणखी एका खासगी रुग्णालयामध्ये एन-चार ‍सिडको परिसरातील कोरोनाबाधित असलेल्या 74 वर्षीय पुरूष रुग्णाचा आज सकाळी 6.30 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अन्य एका खासगी रुग्णालयात 89 वर्षीय पुरुष रुग्णाचाही मृत्यू झाला. शासकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये रहीम नगर येथील 42 वर्षीय पुरुष रुग्णाचा आज पहाटे 6.20 वाजता आणि बायजीपुऱ्यातील इंदिरा नगरातील 55 वर्षीय महिलेचा बुधवारी सकाळी 9.30 वाजता या दोन कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आतापर्यंत घाटीत 70, तीन विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 18, जिल्हा रुग्णालय येथे 01 कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण 89 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने गुरुवारी सकाळी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.