औरंगाबाद - येथील सिल्लोड तालुक्यातील भराडी गावानजिक शॉर्ट सर्किटमुळे हायवा ट्रक पेटल्याची घटना घडली. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, हायवा ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.
हेही वाचा- सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे थकित रक्कम भरा; सरकारची दूरसंचार कंपन्यांना नोटीस
सिल्लोड-कन्नड मार्गाचे काम सुरू आहे. या मार्गावर रुंदीकरण कामासाठी हायवा ट्रकने मुरुम टाकणे सुरू आहे. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास (एम एच 20 ई जी 0777) हा हायवा ट्रक मुरुम घेऊन आला. रस्त्यावर मुरुम टाकत असताना चालकाला उच्च दाब असलेली विद्युत वहिनी दिसली नाही. त्यामुळे हायवा ट्रकच्या ट्राॅलीचा विद्युत वाहिनीला स्पर्श झाला. काही क्षणात हायवा ट्रकने पेट घेतला. हायवा ट्रक पेटल्यानंतर मोठ्या प्रमाणात धूर निघत होता. नेमकी आग कशाला लागली हे पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. या घटनेत हायवा ट्रक भस्मसात झाला.