औरंगाबाद : मुकुंदवाडी भागात चोरांनी धुमाकूळ घातला आहे. संतोषी माता नगरातील किराणा दुकानाचे शटर तोडून रोख, दागिने आणि किराणा साहित्य असा ७२ हजारांचा ऐवज लंपास केल्याच्या घटना समोर आली होती. या घटनेला दोन दिवस उलटत नाहीत तोच चोरांनी पुन्हा एका किराणात दुकानात चोरी केल्याचे समोर आले आहे. ही घटना सोहम मोटर्सच्या मागे, कासलीवाल अपार्टमेंट येथे उघडकीस आली.
हेही वाचा - सॉरी पापा, आत्महत्या करतीय! व्हिडिओ करुन तरुणीने संपवलं आयुष्य
65 हजाराचे साहित्य लंपास -
कैलास ताराचंद मेवाडा (वय - 31, रा. नूतन कॉलनी, क्रांती चौक) यांचे सोहम मोटर्सच्या पाठीमागे असलेल्या कासलीवाल अपार्टमेंट येथे किराणा दुकान आहे. सध्या कोरोनामुळे शासनाने कडक निर्बंध लावले आहेत. त्यानुसार अत्यावश्यक सेवेची आस्थापना या सकाळी अकरा वाजेपर्यंतच उघडी ठेवण्यास परवानगी आहे. त्यामुळे मेवाडा यांनी नेहमीप्रमाणे 19 मेला सकाळी अकरा वाजता दुकान बंद करून घरी गेले. त्यानंतर मध्यरात्री चोरांनी किराणा दुकानाच्या शटरचे सेंट्रल लॉक तोडून आत प्रवेश केला. दुकानातून काजू, बदाम, तेलाचे पॅकेट असे अन्य किराणा साहित्य मिळून ६५ हजार ५० रुपयांचे ऐवज लांबवला.
याप्रकरणी, मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जमादार कोंडके करत आहेत.
हेही वाचा - शिवभोजन थाळी आता १४ जूनपर्यंत मोफत, उद्दीष्टामध्येही दीडपट वाढ