ETV Bharat / state

Chandrakant Khaire on Shivsena BJP Alliance : युतीबाबत उद्धव ठाकरेच निर्णय घेऊ शकतात - चंद्रकांत खैरे

author img

By

Published : Jan 5, 2022, 3:47 PM IST

शिवसेना व भाजप युतीबाबत निर्णय घेण्याचा अधिकार केवळ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आहे तर भजपकडून निर्णय घेण्याचा अधिकार केवळ नरेंद्र मोदींना आहेत. आम्ही दुसऱ्या फळीचे नेते आहोत तर अमित शाह यांनाही तो अधिकार नाही. उद्धव ठाकरे यांच्याशिवाय कोणीही युतीबाबत निर्णय घेऊ शकत नाहीत, अशी प्रतिक्रीया शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी ( Chandrakant Khaire on Shivsena BJP Alliance ) दिली.

चंद्रकांत खैरे
चंद्रकांत खैरे

औरंगाबाद - राज्यमंत्री अब्दुल सत्तार ( Minister Of State Abdul Sattar ) यांनी युतीबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. सत्तार यांना नाही तर युतीबाबत फक्त उद्धव ठाकरेच बोलतील इतर कोणीही नाही, असे मत शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी ( Chandrakant Khaire on Shivsena BJP Alliance ) व्यक्त केले.

बोलताना चंद्रकांत खैरे

काय म्हणाले होते सत्तार..?

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्लीत जाऊन गडकरी यांची भेट घेतली. रस्ते कसे बांधायचे आणि पूल कसे उभारायचे हे गडकरी यांना चांगलेच माहिती आहे. कधी कोणता पूल बांधण्याचा यांचा ज्ञान त्यांना आहे. त्यामुळे सेना भाजपमधला पूल तेच बांधू शकतात. त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन जर युतीबाबत बोलणी केली, तर निश्‍चितच मार्ग निघू शकतो. मात्र, याबाबत सर्वस्वी निर्णय उद्धव ठाकरेच घेतील, असे वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केले होते.

युतीबाबत फक्त उद्धव ठाकरेच बोलतील

युतीबाबत बोलण्याचा अधिकार अब्दुल सत्तार यांना नाही. ते अनावधानाने बोलले असतील. या विषयावर शिवसेनेकडून फक्त पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच बोलू शकतात. आम्ही दुसऱ्या फळीचे नेते आहोत तर अमित शाह यांनाही तो अधिकार नाही. उद्धव ठाकरे यांच्याशिवाय कोणीही युतीबाबत निर्णय घेऊ शकत नाहीत, असे चंद्रकांत खैरे ( Chandrakant Khaire on Shivsena BJP Alliance ) यांनी सांगितले.

हेही वाचा - Jaleel Criticized Danve : रावसाहेब दानवे देशाचे मंत्री की जालन्याचे?, अनेक प्रकल्प पळवले; खासदार जलील यांचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.