ETV Bharat / state

औरंगाबादेत आजपासून 'सेरो सर्वेक्षणा'ला सुरूवात

दिल्लीच्या धर्तीवर औरंगाबादेत आजपासून (सोमवार) 'सेरो सर्वेक्षण' म्हणजेच अँटी बॉडी टेस्ट सुरू करण्यात आली आहे. या सर्वेक्षणात औरंगाबाद शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कशा पद्धतीने झाला, याची माहिती घेण्यात येणार आहे.

Sero survey begins in Aurangabad from today
औरंगाबादेत आजपासून 'सेरो सर्वेक्षणा'ला सुरूवात
author img

By

Published : Aug 10, 2020, 1:01 PM IST

Updated : Aug 10, 2020, 1:37 PM IST

औरंगाबाद - दिल्लीच्या धर्तीवर औरंगाबादेत आजपासून (सोमवार) 'सेरो सर्वेक्षण' म्हणजेच अँटी बॉडी टेस्ट सुरू करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात औरंगाबाद शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कशा पद्धतीने झाला, याची माहिती घेण्यात येणार आहे. महानगरपालिका आणि भारतीय जैन संघटनेच्यावतीने आजपासून शहरातील ११५ वॉर्डांमध्ये अँटी बॉडी टेस्ट करण्यात येणार आहेत. शहरात १० ते १५ ऑगस्ट या कालावधीत अँटी बॉडी टेस्टचे आयोजन करण्यात येणार असून, त्याची सुरूवात आज झाली.

औरंगाबादेत आजपासून 'सेरो सर्वेक्षणा'ला सुरूवात
या मोहिमेत महानगरपालिकेच्या प्रत्येक वार्डमधून ३५ ते ४० जणांच्या रक्ताचे नमुने घेतले जाणार आहेत. या तपासणीमध्ये अँटी बॉडी तयार झाल्या आहेत का? याची तपासणी केली जाणार आहे. ६ दिवस चालणाऱ्या या मोहिमेत २० पथके आहेत. यातील प्रत्येक पथकात २ डॉक्टर, १ लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट आणि भारतीय जैन संघटनेचा १ प्रतिनिधी असणार आहे. या सेरो सर्वेक्षणसाठी २० बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या असून, यात सर्व यंत्रणा उपलब्ध राहणार आहे. प्रत्येकी १० घरानंतर एका घरातील एका व्यक्तीच्या रक्ताचा नमुना घेण्यात येणार असून, या कुटुंबातील लोकांच्या शरीरातील अँटी बॉडी तपासल्या जाणार आहेत. या टेस्टमुळे त्या भागातील किती नागरिकांना कोरोनाची लागण होऊन गेली आहे, हे कळेल. त्यामुळे उपाययोजना करण्यासाठी मदत होणार आहे. या सर्वेक्षणामध्ये कोणत्याही नागरिकाला क्वारंटाईन किंवा आयसोलेट केले जाणार नाही. नागरिकांनी कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नये आणि या सिरो सर्वेक्षणसाठी जास्तीत जास्त नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन औरंगाबाद महानगरपालिका आणि भारतीय जैन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.

Last Updated : Aug 10, 2020, 1:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.